Mumbai News : पत्नीची वार्षिक कमाई ९० लाख; पतीकडून १० हजार रुपये पोटगीचा आदेश सेशन कोर्टाकडून रद्द

Mumbai Session Court : महिलेने २०२२ मध्ये तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत मानसिक छळाचा आरोप करत दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
Bhandara News, Court
Bhandara News, Courtsaam tv
Published On: 

Mumbai News : पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर पोटगीबाबत मुंबईतील सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पत्नीचं उत्पन्न पतीपेक्षा जास्त आहे, हे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पत्नीला पतीकडून १० हजार रुपये पोटगी देण्याचा निर्णय रद्द केला आहे.

सत्र न्यायालयाने दक्षिण मुंबईतील एका ५७ वर्षीय महिलेला पतीकडून १० हजार रुपयांची पोटगी देण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. महिलेचा वार्षिक उत्पन्न ९० लाख रुपये आहे. तर पतीचे वार्षिक उत्पन्न जवळपास ३.५० लाख रुपये आहे. दोघांच्या उत्पन्नातही मोठी तफावत आहे. (Maharashtra News)

Bhandara News, Court
Latur News: पतीचं निधन झालं, विरहानं पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं; हृदय हेलावणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची मुंबईत एक कंपनी आहे. त्या कंपनीत तिचा पती नोकरीला आहे. आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्याचं १९८६ मध्ये लग्न झालं होतं. महिलेने २०२२ मध्ये तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत मानसिक छळाचा आरोप करत दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.  (Latest Marathi News)

पत्नीने घटस्फोटाची मागणी केली होती. त्यावेळी पती घटस्फोट घेण्यासाठी आपल्याकडे 4 कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोपही महिलेने केला होता. मात्र पतीने हे सर्व आरोप फेटाळत उलट पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता.

Bhandara News, Court
Railway Booking Clerk Lost Job : रग्गड पगाराची नोकरी अवघ्या ६ रुपयांसाठी गमावली; रेल्वेच्या बुकिंग क्लार्कवर आली पश्चातापाची वेळ

दंडाधिकारी न्यायालयाने डिसेंबरमध्ये महिलेला पोटगी मंजूर केली होती. मात्र पतीने याविरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रकरणाची माहिती तपासून घेतल्यानंतर महिलेचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर कायदेशीर बाजूंचा विचार करत सत्र न्यायालयाने पत्नीला पतीकडून पोटगी देण्याचा निर्णय रद्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.