पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या कचाट्यात सापडला
पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या कचाट्यात सापडलाSaam Tv

पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या कचाट्यात सापडला

ऐन वटपोर्णिमा दिवशीच वयोवृद्ध महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी चोरून, पोबारा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची मुसक्या पुणे पोलिसांनी आवळले आहेत.
Published on

पुणे : ऐन वटपोर्णिमा दिवशीच वयोवृद्ध महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी चोरून, पोबारा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची मुसक्या पुणे Pune पोलिसांनी आवळले आहेत. पुणे पोलिसांच्या Police गुन्हे शाखेने सापळा रचून, आरोपीला अटक Arrested केली आहे. आरोपीने आतापर्यंत शहरात १० गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी जवळून ७ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबरोबरच गुन्ह्यांमध्ये वापरलेली चोरीची दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. असद ऊर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी ऊर्फ इराणी असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने २०१९ पासून अनेक ठिकाणी चोऱ्या केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा आरोपी फरार होता.

हे देखील पहा-

पण यावेळी आपल्या बायकोला Wife भेटायला आल्याने तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. आरोपी जाफरी हा आपल्या बायकोला भेटायला आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली होती. या आधारे पोलिसांनी सापळा रचून, आरोपीच्या मुसक्या आवल्या आहेत. आरोपीने २४ जून दिवशी वट पोर्णिमेच्या होती. एका महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी ओढून पळ काढला होता.

पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या कचाट्यात सापडला
नांदेडमध्ये थरार : आरोपीच्या खंजरला पोलिसांच्या गोळीचे उत्तर; सिनेस्टाईलने केली अटक

या प्रकरणाचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावरच होते. मात्र, त्याने प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा दिला होता. आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने शहारामधील विविध भागांमध्ये आतापर्यंत ९ सोनसाखळ्या चोरले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय एक दुचाकी चोरीचा आरोप देखील त्याच्यावर आहे.

आरोपी जाफरी हा सोन साखळी चोरल्यावर, ती साखळी कोंढव्यामधील सराफ विशाल सोनी याला विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सराफ व्यवसायिक विशाल सोनी याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या जवळून पोलिसांनी १४ तोळे सोने जप्त केले आहे. या घटनेचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com