नांदेडमध्ये थरार : आरोपीच्या खंजरला पोलिसांच्या गोळीचे उत्तर; सिनेस्टाईलने केली अटक

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिखलवाडी भागात ता. सात जुलै रोजी जमीर बेग या रिक्षा चालकाला गंभीर मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला होता.
नांदेडमध्ये गोळीबार करुन आरोपीला अटक
नांदेडमध्ये गोळीबार करुन आरोपीला अटक
Published On

​नांदेड : वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनप्रकरणातील दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली. यावेळी आरोपींने पोलिसांच्या दिशेने खंजर फेकून मारला. मात्र सुदैवाने पोलिसांनी तो खंजरचा नेम चुकवला. परंतु त्याच गतीने पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यात एकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई वजिराबाद पोलिसांनी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळटेकडी परिसरात मंगळवारी (ता. २७) दुपारी एकच्या सुमारास केली. पकडलेल्या दोघांपैकी एकजण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. घटनास्थळाला नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी भेट दिली. Thrill- in-Nanded-Police -respond- to -accused's -dagger- Cinestyle- arrested

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिखलवाडी भागात ता. सात जुलै रोजी जमीर बेग या रिक्षा चालकाला गंभीर मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वप्रथम प्राणघातक हल्ला व नंतर खूनाचा गुन्हा वाढ करण्यात आला होता. अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, फौजदार अब्दुल रब यांनी घेतला. मारेकऱ्यांची ओळख पटल्यानंतर तपासाला वेग मिळाला.

हेही वाचा - अलीकडेच शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे...

जमीर बेगचा मारेकरी सोनुसिंग भोंग अटक

जमीर बेगला मारणारा सोनुसिंग उर्फ सोनु भोंग राजेंद्रसिंग चव्हाण (वय २०) रा. भगतसिंघ रोड नांदेड आणि त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक हा शहराच्या लक्ष्मीनगर भागात एका घरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. मंगळवारी सकाळी सोनु भोंगला शोधण्यासाठी वजिराबादचे पोलिस पथक लक्ष्मीनगर येथे एका घरात गेले होते. पण तेंव्हा पोलिसांना खंजीर दाखवून सोनु भोंग पळून गेला. मात्र त्याच्यासोबतचा विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपीच्या खंजरला पोलिसांच्या गोळीने उत्तर

आरोपी एका दुचाकीवरुन माळटेकडीकडे पळत असताना पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांवर त्यांनी खंजर फेकून मारली. मात्र पोलिसांनी तो नेम चुकवत हवालदाराने आपल्या पिस्तुलातून फायर केला. तो फायर एकाच्या पायाला लागला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र पोलिसांनी सोनसिंग भोंगला अटक केली. जखमी झालेला आरोपी मात्र पसार झाला. घटनेची माहिती पोलिस अधीक्षक प्रमदकुमार शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांना देण्यात आली.

येथे क्लिक करा - फेसबुकवरील मैत्री पडली चांगलीच महागात

पोलिस कारवाईत यांचा होता समावेश

ही कार्यवाही करणाऱ्या पथकामध्ये पोलिस उपनिरिक्षक अब्दुल रब, उत्तम वरपडे, पोलिस अंमलदार दत्ता जाधव, संतोष बेल्लूरोड, विजयकुमार नंदे, चंद्रकांत बिरादार, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, मनोज परदेशी, अजय यादव आणि संतोष कदम यांचा समावेश होता. या कारवाईबद्दल एसपी शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, डीवायएसपी श्री. देशमुख, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com