
राज्यात अनेक भागांत पावसाने जोरदार बॅटिंग
मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील ३ तास अत्यंत महत्वाचे असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय.
राज्यातील विविधभागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. ऐन दिवाळीमध्ये मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.पश्चिम उपनगरात मागील 15 ते 20 मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीय. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. पाऊसासह जोरदार वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर बदलापुरातील वीज प्रवाह करणाऱ्या सब स्टेशन वरतीच वीज पडली आहे. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे तसेच तेथील अनेक तारा तसेच केबल जळले आहेत. तर ठाण्यातही विजेच्या कडकडासह पाऊस झालाय.
पश्चिम उपनगरात मागील 15 ते 20 मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीय. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय.
पाऊसासह जोरदार वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर बदलापुरातील वीज प्रवाह करणाऱ्या सब स्टेशन वरतीच वीज पडली आहे. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे तसेच तेथील अनेक तारा तसेच केबल जळले आहेत. तर ठाण्यातही विजेच्या कडकडासह पाऊस झालाय.
दरम्यान आता हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिलाय. पुणे, रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिलाय. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण पश्चिममधील अनुपमनगर परिसरातील तीन घरांवर झाड पडले आहे. सायंकाळनंतर सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. या घटनेत तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.
अंबरनाथमध्येही दमदार पाऊस झालाय. कल्याण डोंबिवली अंबरनाथ ,उल्हासनगर, बदलापूर परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून कल्याण अनुपमनगर मधील एका घरावर झाड कोसळून दोन जण जखमी झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.