Walmik Karad News : संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराड कुठं कुठं हिंडला? चक्रावणारी माहिती उघड

Walmik Karad Latest News : संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराड देशातील कानाकोपऱ्यात हिंडला. उज्जैन ते पुणे असा प्रवास कराडने केला. पुण्यात आल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. याच वाल्मिक कराडविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Santosh Deshmukh Case
Walmik Karad Surrender Saam Tv
Published On

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आलाय. वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीला शरण आल्यानंतर मोठे पुरावे हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. कोर्टाकडून १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळालेल्या वाल्मीक कराड हा उज्जैन, कर्नाटक ते पुणे व्हाया गोव्यात देखील गेला होता. तब्बल ११ दिवस बेपत्ता असलेला वाल्मिक उज्जैन, कर्नाटक ते पुणे व्हाया गोवा हिंडून सीआयडीला शरण गेला, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालं आहे. या प्रकरणतील आरोपी वाल्मीक कराड हा सीआयडीला शरण आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी वाल्मीक कराड हा ११ दिवस कुठे होता, याची माहिती आज सीआयडीने दिली. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याची आज बुधवारी कसून चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केली. यामध्ये काही मुद्दे समोर आल्याची माहिती हाती आली आहे.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड सरेंडर, तीन फरार आरोपींचं काय? CID कडून तपास सुरूच

आज बुधवारी दिवसभरात आणखी तिघांची चौकशी केली. आतापर्यंत तिन्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या नातेवाईक कुटुंबीयांसोबतच व्यावहारिक संबंध असणाऱ्यांच्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक खाते आणि मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. तपास यंत्रणाकडून सर्वच बँकांना पत्र पाठवण्यात आले आहेत. एकेक बँका माहिती पुरवत आहेत. अद्याप त्यात झालेले ट्रान्झॅक्शन समोर आलेले नाहीत. मात्र ते कोट्यावधी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा आहे.

Santosh Deshmukh Case
Walmik Karad: वाल्मीक कराड CID समोर शरण, संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...

वाल्मीक कराड ११ दिवस कुठे होता?

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक हा देशातील विविध भागात हिंडला. 'वाल्मीक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला होता. पुढे कर्नाटकावरून गोव्यात गेला. तो गोव्यातून पुण्यात आला. पुण्यात येऊन सीआयडीला शरण गेल्याचे सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी फरार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा २०२३ मधील ३०७ च्या गुन्ह्यात आरोपी आहे. तो तेव्हापासून फरार असल्याची माहिती हाती आली आहे. त्याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तो तेव्हापासून फरार आहे.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Death Case : मस्साजोग पुन्हा तापलं; उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com