Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड सरेंडर, तीन फरार आरोपींचं काय? CID कडून तपास सुरूच

Beed Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. मंगळवारी वाल्मीक कराड याने सरेंडर केले. पण तीन फरार आरोपींचं काय? असा सवाल मस्साजोगमधील गावकऱ्यांनी केलाय.
Walmik Karad: वाल्मीक कराड CID समोर शरण, संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...
Walmik Karad SurrenderSaam Tv
Published On

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला अन् बीडमधील कायदा सुवस्थेची चर्चा सुरू झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. तर वाल्मीक कराड यानं सरेंडर केले. वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे. वाल्मीक कराड यानं सरेंडर केलं, पण तीन फरार आरोपींचं काय? असा सवाल बीडमध्ये उपस्थित होत आहे. मस्साजोग गावकऱ्यांकडून आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे. फरार आरोपींना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. वाल्मीक कराड यानं सरेंडर केले, पण सीआयडी तीन फरार आरोपींना पकडणार का? याची चर्चा सुरू आहे.

सीआयडीकडून तपास सुरूच -

९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. जनतेचा रोष पाहाता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. वाल्मीक कराड यानं सीआयडीलाही काही दिवस चकमा दिला. त्यानं मंगळवारी पुण्यात सरेंडर केले. आता सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मुख्य आरोपी फरारच, अटक कधी?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले याच्यावर आहे. सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार का? असा सवाल उपस्थित होतोय. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त होतोय.

कुटुंबियांची चौकशी

वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर आहे. सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकाशी झाल्याची सूत्रांनी सांगितले. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का? याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती मिळाली. सीआयडीकडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ आरोपींना तात्काळ अटक करा, ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 22 दिवस उलटले, मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तात्काळ या फरार आरोपींना अटक करावं, ही प्रमुख मागणी घेऊन जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवले

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लोकांना आणण्यात आले पोलीस कस्टडीमधील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत यामुळे पोलिसांनी मोठे पावलं उचलत आरोपी विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि केदार यांना या आरोपींना आता दुसऱ्या लॉकप मध्ये हलवण्यात आले आहे गेवराईच्या लोकांमध्ये त्यांना हरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मीक कराड याला ज्या लोकांमध्ये ठेवला आहे. त्या लॉकअप मध्ये असलेले इतर चार आरोपी दुसऱ्या पोलीस ठाण्यातील लॉकअपकडे पाठवले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्याच्या लोकांमध्ये यापूर्वी चार आरोपी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये विष्णू चाटे हा खून आणि खंडणीच्या पुण्यातील आरोपी आहे. त्यासोबत तीन आरोपीही खुन आणि इतर गुन्ह्यातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com