Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

Mumbai Churchgate Station Stall Viral Video : चर्चगेट स्थानकातील ‘ओरिजिन’ चहाच्या स्टॉलवर उंदीर आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने तपासणी केली. स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या त्रुटींवर कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली.
Mumbai Churchgate Railway Station Rat Viral Video
Mumbai Churchgate Railway Station Rat Viral Video Saam Tv
Published On: 
Summary
  • चर्चगेट स्थानकातील ‘ओरिजिन’ चहाच्या स्टॉलवर उंदीर आढळल्याचा व्हिडीओ

  • २६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला

  • व्हिडीओनंतर पश्चिम रेल्वेने त्याच दिवशी संबंधित स्टॉलची तपासणी केली

  • तपासणीत उघडे खाद्यपदार्थ, अस्वच्छ बेसिन, झाकणाविना चटणीचे डबे आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या

मयूर राणे, मुंबई

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातील संतापजनक प्रकार समोर आला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकातील ‘ओरिजिन’ चहाच्या स्टॉलमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. प्रवाशाने २६ सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वेकडून त्याच दिवशी संबंधित स्टॉलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

पश्चिम रेल्वेच्या तपासणीदरम्यान स्टॉलवर खाद्यपदार्थांबाबत निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आले. विक्रेता ‘एमडी. कसाब’ याचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचेही तपासणीत समोर आले. याशिवाय चटणीचे डबे झाकणाविना ठेवण्यात आले होते. प्लॅटफॉर्मवर तेल आणि चटणी सांडलेली असल्याने परिसरातील स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले. तपासणीमध्ये शिजवलेले खाद्यपदार्थ तसेच वड्याचे मिश्रण उघड्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेले आढळले. तसेच कोबीची साल उघडी पडलेली होती.

Mumbai Churchgate Railway Station Rat Viral Video
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे धुण्याचे बेसिनही अस्वच्छ स्थितीत आढळले. त्यामुळे स्टॉलवर कीटक नियंत्रण, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे पश्चिम रेल्वेने नमूद केले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला दोन दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास संबंधित स्टॉलचा परवाना किंवा कंत्राट रद्द करण्यासह कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पश्चिम रेल्वेने दिला आहे. दरम्यान, प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित ‘ओरिजिन’ चहाचा स्टॉल २६ सप्टेंबरपासून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही, याबाबत या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com