Bike Viral video
Bike Viral videoSaam TV

Kalyan Viral Video: मौत का कुआं! ट्रॅफिकमधून मार्ग काढण्यासाठी नागरिक चक्क पाईपमध्ये शिरले, कल्याणमधील व्हिडियो व्हायरल

Kalyan Viral Video: कल्याणमध्ये वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वारांनी चक्का भल्या मोठ्या पाईपमधून मार्ग काढला.
Published on

अभिजीत देशमुख

Kalyan News: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. रस्त्यावरील खड्डे, दुरुस्तीची कामं, विकासकामे यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या वाहतूक कोडींतून मार्ग काढणे वाहन चालकांसाठी तारेवरची कसरतच असते. कल्याणमध्ये वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वारांनी चक्क भल्या मोठ्या पाईपमधून मार्ग काढला.

कल्याण शीळ रोड देसाई गाव परिसरातून वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना दुचाकीस्वार चक्क रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोठ्या पाईपमधून दुचाकी चालवत असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वार जीव मुठीत धरून हा प्रवास करत आहेत. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने कल्याण शीळ रस्त्याचे निदान आता तरी हे काम जलद गतीने करत वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  (Viral Video

Bike Viral video
Accident CCTV Footage: बाईकची घोड्याला जोरदार धडक! काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

कल्याण शीळ रोडवर सकाळ सायंकाळच्या सुमारास मानपाडा चौक, देसाई गाव, काटई नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडते. काल सायंकाळच्या सुमारास देसाई गाव परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही बहाद्दरांनी चक्क विरुद्ध दिशेने दुचाकी नेल्या. (Latest Marathi News)

Bike Viral video
Kopargaon APMC Election : बाजार समितीत भाजप-राष्ट्रवादी-ठाकरे गटाची युती, अहमदनगरमधील अनोख्या युतीची चर्चा

इतकेच नव्हेतर कल्याण शीळ रोडवर असलेल्या देसाई गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाईपमधून दुचाकी चालवल्या. हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com