Accident CCTV Footage: बाईकची घोड्याला जोरदार धडक! काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

Accident Video : अपघातात घोडा आणि बाईकवरील व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
Accident Video
Accident Video Saam TV

Viral Video : सीसीटीव्हीमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे बरेच व्हिडीयो समोर येत असतात. यातील काही अपघात इतके भीषण असतात की पाहणेही शक्य होत नाहीत. असाच एक अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. बाईक आणि घोडा यांच्या धडकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घोडा आणि बाईकवरील व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील देवास येथील ही घटना आहे. अपघाताची घटना मध्यरात्रीची आहे. रात्र असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळही फार दिसत नाही. यावेळी घोड्यावर बसलेला एक व्यक्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्त्यावरुन कोणती गाडी येत नाही ना याची काळजी घेताना घोडस्वार दिसत आहे. (Viral Video

Accident Video
Viral Video: गुरु-शिष्याची 'नटरंग'वर जबरदस्त जुगलबंदी, व्हिडीओ पाहून अजय-अतुल नक्की भेटायला बोलवणार

रस्ता ओलांडण्यासाठी गाडीची वाट पाहत आहे. तिथून गाडी पुढे जाताच, घोडेस्वार पुन्हा रस्ता ओलांडू लागतो, तेवढ्यात रस्त्यावरुन एक वेगवान बाईक येते आणि घोड्याला जोरात धडकते. यानंतर घडलेला प्रकार मन व्यथित करणारा आहे. (Latest Marathi News)

Accident Video
Viral Video: चक्क घोड्यावरुन आला अन् बॅग हिसकावून पळाला, हटके स्टाईल चोरीचा स्टंट पाहून लावाल डोक्याला हात; VIDEO तुफान VIRAL

बाईक आणि घोड्याच्या जोरदार धडकेनंतर बाईक रस्त्यांनी फरफटत दूरवर झाते. या धडकेत बाईक चालक आणि घोडेस्वारही रस्त्याच्या मधोमध पडतात. घोडाही धडकेनंतर रस्त्यावर पडतो आणि काही क्षणात घोडा उभा राहतो. रस्त्याच्या मधोमध हा सगळा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाईक चालवणारी व्यक्ती आणि घोडेस्वार या अपघातात जखमी झाले आहेत. तर घोड्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अपघातात हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com