Police Viral Video : खाकीतला देव माणूस! फुटपाथवर राहणाऱ्या मुलासाठी दाखवली माणुसकी; साडीचा झुला पाडला अन्...

Mumbai Police Viral Video News : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने फुटपाथवर राहणाऱ्या चिमुकल्यासाठी सुरक्षित पाळणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Police Viral Video : खाकीतला देव माणूस! फुटपाथवर राहणाऱ्या मुलासाठी दाखवली माणुसकी; साडीचा झुला पाडला अन्...
Mumbai Police Viral Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई पोलिसाचा माणुसकी दाखवणारा व्हिडिओ व्हायरल

  • फुटपाथवरील चिमुकल्यासाठी पाळणा दिला

  • सोशल मीडियावर पोलिसाच्या कृतीचे जोरदार कौतुक

  • खाकी वर्दीतली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ नेहमी वाईट असतातच असं नाही. बऱ्याचदा काही व्हिडिओ आपल्या विचारांमध्ये भर पाडतात, तर काही व्हिडिओ अगदी काळजाला भिडतात. असाच एक मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी खाकी वर्दीत असलेल्या देवरूपी पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी यांनी फुटपाथवर राहणाऱ्या छोट्याशा बाळाचा झोळीचा पाळणा तोडून त्या बाळाला एक सुरक्षित पाळणा दिला असल्याचे पाहायला मिळतं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, मुंबईतील एका रस्त्याच्या फुटपाथवर झोपडीत एक गरीब कुटुंब राहत आहे. काठ्यांच्या मदतीने कापड बांधून एका लहान मुलासाठी एक पाळणा बनवण्यात आला आहे. त्या झुल्यात तो मुलगा झोपलेला आहे. तेवढ्यात एक पोलिस हातात काठी घेऊन तिथे येतो. त्याने प्रथम मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. नंतर तो झुला तिथून काढून टाकला.

Police Viral Video : खाकीतला देव माणूस! फुटपाथवर राहणाऱ्या मुलासाठी दाखवली माणुसकी; साडीचा झुला पाडला अन्...
Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

हे कृत्य पाहून पोलिसावर चीड येईल. मात्र त्याने एक नवीन झुला मागवला आणि तो त्याच जागी ठेवला. मग त्याने मुलाला त्यात झोपवले.पोलिसाच्या या सुंदर आणि कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, मी या रस्त्यावरुन दररोज ये जा करतो. त्यावेळेस हे बाळ त्याला रस्त्यावरील मच्छर चावतात म्हणून रोज रडतं असतं. मात्र त्याची आई देखील परिस्थिती पुढे हतबल असल्या कारणाने ती देखील त्यासाठी काही करू शकतं नव्हती. त्यामुळे मी ठरवले या बाळाला सुंदर पाळणा घेऊन द्यायचा. दरम्यान खाकी वर्दीतल्या या रुबाबदार मुंबई पोलिसाचं नेटकऱ्यांनी कौतुक केले असून वर्दीतील देव म्हणून संबोधले आहे. या व्हिडिओने नेटकरी भावुक झाल्याचे पाहायला मिळतं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com