Mumbai Local : '...काट डालुंगा' MSF जवानाला मारहाण अन् धमकी; मुंबई लोकलमध्ये राडा, Video

Mumbai Local Train News : कल्याण लोकलमध्ये MSF जवान आकाश बाबर यांना टोळक्याकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Mumbai Local : '...काट डालुंगा' MSF जवानाला मारहाण अन् धमकी; मुंबई लोकलमध्ये राडा, Video
Mumbai Local Train NewsSaam Tv
Published On
Summary
  • विक्रोळी स्टेशनवर MSF जवान आकाश बाबर यांना मारहाण

  • बाबर यांना जीवे मारण्याची धमकी

  • लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण

  • मुंबई उपनगरी रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

लोकलमधील गर्दी आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी आणि या गर्दीसोबतच वाढणारे वाद हे हिंस्त्रक वळण घेत आहेत. रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क जवानालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनवर कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या लोकलमध्ये MSF जवानाला चार ते पाच परप्रांतीयांनी मिळून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. आकाश बाबर असे मारहाण करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे, ते बीकेसी (BKC) येथे कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बाबर हे कल्याण लोकलने प्रवास करत होते. या दरम्यान परप्रांतीय तरुणाशी त्यांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद तिथेच मिटेल असे वाटत असताना, तरुणाने टोळीसह आकाश बाबर यांना मारहाण करत काट डालुंगा अशी धमकी दिली.

या टोळीने रेल्वेमध्येच आकाश बाबर यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. आधीच्या लोकलमध्ये संबंधित तरुणासोबत आकाश बाबर यांचे वाद झाले. यानंतर आकाश विक्रोळी रेल्वे स्टेशनवर उतरले असता काही माणसांना बोलावून हा तरुण लोकलमध्ये शिरला.

Mumbai Local : '...काट डालुंगा' MSF जवानाला मारहाण अन् धमकी; मुंबई लोकलमध्ये राडा, Video
संतापजनक! धावत्या बसमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, नराधम 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात; त्या २४ तासांत नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे रेल्वेतील अन्य प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तसेच परप्रांतीयांची वाढती मुजोरी देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com