Versova Jcb Accident: पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या भावाला नोकरी

Versova Jcb Accident Mmrda Surya Project : वर्सोवा येथे झालेल्या या घटनेला जवळपास एक महिना होत आला असून, जेसीबी चालक राकेश यादव यांचा शोध घेण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. आज मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते यादव कुटुंबीयांना ५० लाख रुपायांची आर्थिक मदत करण्यात आलीय.
Versova Jcb Accident: पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या भावाला नोकरी
Versova Jcb Accident Mmrda Surya Projectsaam

मुंबई: फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबियांना कंपनीकडून आर्थिक मदत देण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मजुराच्या पीडित कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आलाय. राकेश यादव यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

साधारण एका महिन्याआधी वर्सोवा खाडीजवळ दुर्घटना घडली होती. सूर्य प्रकल्पाचे काम सुरू असताना वर्सोवा खाडीजवळ भिंतीसह जमीन खचून जेसीबी चालक जेसीबी मशिनसह मातीच्या ढिगाऱ्यात गाडला गेला. १७ दिवस त्याचा शोध सुरू होता, तरीही त्याचा काही थांगपत्ता लागला. अखेर सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आलं.

कोसळणारा पाऊस आणि इतर कारणांनी अजूनही त्याचा काही पत्ता लागलेला नाहीये. जेसीबी चालकाचा अद्याप शोध सूरू आहे. जेसीबी चालकाच्या कुटुंबावर दुखाचे आभाळ कोसळलं आहे. दरम्यान शोध चालू असताना या कुटुंबाला कंपनीने ५० लाखांची मदत आज केली.

आज जेसीबी चालक राकेश यादव यांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५लाख विम्याचे असे ५० लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. तसेच राकेश यादव यांच्या भाऊ दुर्गेशला एल अँण्ड टी कंपनीमध्ये नोकरी देण्यात आलीय.

काय झाली होती घटना

एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सूर्या प्रोजेक्टचं काम चालू होतं. त्यासाठी पाईपलाईनचं काम चालू होतं. राकेश यादव हे जेसीबी चालक होते. जेसीबी ऑपरेटर करताना असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं.

मात्र बचाव कार्य करताना पाऊस पडत असल्याने बचावकार्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. अद्याप राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदतनिधी कुटूंबीयांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.

Versova Jcb Accident: पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या भावाला नोकरी
Shushma Andhare: जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैसे वाटप; सुषमा अंधारेंच्या आरोपानं खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com