Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Local Crime Branch : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे आणि त्यांच्या पथकाला संशयित आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले.
beed police arrests one in minor girl molestation
beed police arrests one in minor girl molestation Saam Digital

- विनाेद जिरे / संजय सूर्यवंशी

Crime News :

लग्नाचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आष्टी तालुक्यातील एका 17 वर्षाच्या मुलीला तिच्या घरा शेजारी राहणा-या एकाने तिला पळवून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. संबंधिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पीडिता ही 6 महिन्यांची गर्भवती असल्याचा अहवाल आला. या धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन एकास आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

beed police arrests one in minor girl molestation
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

नांदेड एलसीबीकडून फरार आराेपीस अटक

नांदेड जिल्ह्यात खूनासह 8 घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. संतोष उर्फ चॉकलेट्या बापुराव भोसले असे अटक केलेल्या आराेपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

संतोष भोसले कंधार तालुक्यातील आपल्या गावी कुरुळा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे आणि त्यांच्या पथकाला संशयित आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले.

पथकाने शिताफीने संतोष भोसले याला घरातून अटक केली. पाेलिसांनी त्याच्याकडून घरफोड्यात चोरीला गेलेला पावणे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपीस पुढील तपासासाठी मुखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती एलसीबीच्या पथकाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

beed police arrests one in minor girl molestation
Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com