चाळीसगाव पुरस्थिती..तिनशे घरांत शिरले पाणी; मदत कार्यासाठी एसडीआरएफ टीम दाखल

चाळीसगाव पुरस्थिती..तिनशे घरांत शिरले पाणी; मदत कार्यासाठी एसडीआरएफ टीम दाखल
चाळीसगाव पुरस्थिती
चाळीसगाव पुरस्थिती

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पुरस्थिती गंभीर बनली आहे. साधारण तिनशे घरांमध्‍ये पाणी शिरल्‍याचा प्राथमिक अंदाज असून, एका इसमाचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद झाली आहे. याकरीता मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफची टीम दाखल झाल्‍याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे दिली आहे. (jalgaon-news-chalisgaon-heavy-rain-sdrf-team-spot-in-help)

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या काही भागांमध्ये ९० एमएल ते १५० एमएल पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चाळीसगावच्या नद्या व नाल्यांना पाणी वाढले.

शोधकार्य सुरू

साधारणपणे तिनशे घरांमध्ये पाणी शिरले आहे. या घटनेमध्ये एक इसम मृत पावल्याची नोंद आपल्याकडे आलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक जनावरे ही वाहून गेल्याचे घटना समोर येत आहेत त्याचा शोध घेतला जात आहे,३० लोकांची टीम आपल्याकडे दाखल झालेली आहे, ती टीम सध्या घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या मदत कार्य सुरू असून आगामी काळाचा अंदाज घेऊन मदतकार्य सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली आहे.

चाळीसगाव पुरस्थिती
Chalisgaon Rain Update : बाजारपेठेतील दुकाने पाण्यात; मालाची खराबी

पुराच्‍या पाण्याचा जोर वाढला

चाळीसगावमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर चाळीसगाव शहरात घुसलेल्या पुराच्या पाण्याचा जोर आणखीनच वाढला आहे. पुरामुळे शहरातील तब्बल तीन ते चार पूल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. तसेच दुकानांच्या बेसमेंटमध्ये देखील दहा फुटांहून अधिक उंचीवर पाणी साचल्यामुळे संपूर्ण दुकानांमध्ये पाणी घुसले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com