Chalisgaon Rain Update : बाजारपेठेतील दुकाने पाण्यात; मालाची खराबी

बाजारपेठेतील दुकाने पाण्यात; मालाची खराबी
Chalisgaon Rain
Chalisgaon Rain
Published On

चाळीसगाव (जळगाव) : शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर बाजारपेठेतील दुकानात जवळपास अर्ध्याहून जास्त उंचीवर पाणी शिरले आहे. यामुळे दुकानांमध्ये असलेला संपूर्ण सामानाची नासधूस झाल्‍याचे चित्र येथे आहे. (jalgaon-news-chalisgaon-heavy-rain-update-shop-in-water)

चाळीसगाव तालुका व परिसरात मध्‍यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने नदीला पुर आला. शिवाय, अनेक गावांमध्‍ये देखील पाणी शिरले आहे. यामुळे दुकाने व घरे पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाऊस बंद झाल्‍याने पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. यानंतरच नुकसानीचा अंदाज येवू शकेल.

नुकसान भरपाई मिळावी

व्यापाऱ्यांनी प्रशासनावर या सर्व परिस्थितीचे खापर फोडले असून प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना यासंदर्भातील देण्यात आली नाही. यामुळेच दुकानातील सामानांचे नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त व्यापार्‍यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com