Sangli Accident: भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेरोला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

Ratnagiri Nagpur highway Accident News: बोलेरो गाडी आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला....
Accident News
Accident NewsSaaMTV

विजय पाटील, प्रतिनिधी...

Sangli Accident News: सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bolero- Tractor Accident)

Accident News
Karnataka New CM: अखेर ठरलं! सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; DK शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गावर (Ratnagiri- Nagpur Highway) बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

असा झाला अपघात...

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडीतील मृत कुटूंबीय हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचली असता,रॉग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. ज्यामध्ये भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. (Latest Marathi News)

Accident News
Nagpur Crime News : भरदिवसा पेट्राेल पंप मालकाला संपवलं, दाेन लाखांची लूट; नागपूरात तिघांचा शाेध सुरु

या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला. भयंकर अपघातात एकाच कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. (Accident News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com