Vasai News: रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून ७ वर्षीय मुलीचा मृत्यू, वसईतील घटना

Vasai Shocking News: वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वसईत रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
Vasai News
Vasai NewsSaam TV

वसईतील रणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एचडी नावा रिसोर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वसई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. याआधीही वसईतील रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. मे महिन्याती बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

समिक्षा जाधव असे मृत मुलीचे नाव आहे. समीक्षा तिची आजी आणि आजीच्या मैत्रिणींच्या ग्रुपसह पिकनिकसाठी गेली होती. वसईतील एका रिसॉर्टमध्ये १५ महिलांचा ग्रुप पिकनिकसाठी गेले होते. पूल आणि वॉटरपार्कमध्ये खेळून झाल्यावर सर्वजण जेवणासाठी निघाले होते. मात्र, सर्वजण जेवणासाठी गेले असता समिक्षा मात्र पुन्हा पूलमध्ये गेले. दुपारी जेवणाची गडबड असल्याने तिला पूलमध्ये जाताना कोणीही पाहिले नाही.

समिक्षा बेपत्ता असल्याचे तिच्या आजीच्या लक्षात आले. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. परंतु तोपर्यंत समिक्षा पाण्यात बुडत होती. समिक्षाने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेथील उपस्थित लोकांनी तिला स्विमिंग पूलच्या बाहेर काढले. तिचा जीव वाचवला. परंतु नंतर समिक्षा पाणी प्यायली आणि बेशुद्ध पडली.

Vasai News
Porsche Car Accident: पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट; बदलेले रक्त एका महिलेचे, चौकशी समितीचा अहवाल

समिक्षाला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला तिथे मृत घोषित करण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. समिक्षाला पोहता येत नव्हते. तिची आई नसल्याने ती आजीसोबत राहायची.तिची आजी घरकाम करते. वडील गावी राहतात. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत,असे पोलिसांनी सांगितले.

Vasai News
Pune Hit and Run Case : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली? पोलिसांकडून शोध सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com