Muslim Aarakshan
Muslim AarakshanSaam TV

Muslim Aarakshan: 'मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे'; मागणी मान्य न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा

Muslim Reservation: अहमदनगरमध्ये आज सायंकाळी चार वाजता ओबीसी एल्गार सभा होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज ओबीसी नेते सभेसाठी येणार आहेत.
Published on

Reservation News:

मराठा व ओबीसी हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात एकमेकांविरोधात उभे असल्याचे पाहायला मिळते आहे. यातच आता मुस्लिम समाजानेही ५ टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशिल मार्गाने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुस्लिम समाजाला काँग्रेस सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण कायम करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाचे नेते खलील सय्यद यांनी दिला आहे. पृथ्वीराज चव्हान यांच्या सरकारमध्ये मराठ्यांना १६ आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिलं होतं, याची आठवण सय्यद यांनी यावेळी करून दिली.

मुस्लिमांच्या आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी समिक्षा नोंदवत सांगितलं होतं की, मुस्लिम समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यामुळे त्यांना ५ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देत आहे तसे आरक्षण मुस्लिम समाजाला देखील द्यावे, अशी मागणी खलील सय्यद यांनी केली आहे.

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता मुस्लिम समाज देखील आरक्षणासाठी पुढे येत असल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

ओबीसी एल्गार सभा

अहमदनगरमध्ये आज सायंकाळी चार वाजता ओबीसी एल्गार सभा होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज ओबीसी नेते सभेसाठी येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील आज नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. मात्र ओबीसी एल्गार सभेच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने ते सहभागी होणार का नाही यामध्ये संभ्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com