ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

वसईत एका ATM मिशनमधील तांत्रिक घोळामुळे नागरिक मालामाल झालेत... कारण 400 रुपयांची मागणी करताच ATMमधून चक्क 2 हजार रुपये मिळत होते... त्यामुळे पैशांसाठी ATMबाहेर ग्राहकांची झुंबड कशी उडाली ? आणि हा सगळा प्रकार नेमका कसा समोर आला ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Published On

डिजिटल इंडियाच्या आणि युपीआयच्या जमान्यात आजकाल एटीएम बाहेरच्या रांगा कमी झाल्या आहेत. पण विचार करा... जर तुम्ही एखाद्या एटीएममध्ये गेलात, तिथे 400 रुपये काढण्यासाठी बटण दाबलं आणि मशीनमधून चक्क 2000 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा बाहेर आल्या तर? होय, असाच काहीसा 'सावळा गोंधळ' वसईमध्ये पाहायला मिळालाय...वसईतील गोलानी नाका परिसरात असलेल्या 'हिताची' कंपनीच्या एटीएममध्ये हा प्रकार घडलाय... .

कमी ट्रन्जेक्शनचा मेसेज येऊन मागणीपेक्षा जास्त पैसे निघत असल्यानं नागरिकांनीही या ATM बाहेर गर्दी केली... मात्र ज्यावेळी साम टिव्हीच्या प्रतिनिधीनं घटनास्थळ गाठलं तेव्हा काय आढळलं ? तुम्हीच पाहा....

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत एटीएममधील सर्व व्यवहार बंद केल्यानं आर्थिक फसवणुक टाळलीय...आता एटीएमच्या ट्रेमध्ये नोटा चुकीच्या पद्धतीने भरल्या गेल्या होत्या की सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाला होता? याची तपासणी तांत्रिक पथक करत आहे. त्यामुळे एटीएम मशीनमधून चुकून जास्त पैसे आले तर ती लॉटरी आहे, असं समजून आनंद मानण्याची चूक करू नका, कारण बँक नंतर हा सर्व हिशोब सीसीटीव्ही आणि कार्ड डिटेलच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून वसूल करतेच. पण वसईतील या गंडलेल्या एटीएमने मात्र स्थानिक नागरिक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडवून दिली, हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com