Vaishnavi Hagawane: पहाटे मित्रांसोबत पार्टी, अटकेआधी मटणावर ताव, CCTV ने राजेंद्र हगवणेचं पितळ उघडं पडलं| VIDEO

Rajendra Hagawane Arrested: हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासऱ्याला आणि दिराला आज पहाटे अटक करण्यात आली. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
Vaishnavi Hagawane: पहाटे मित्रांसोबत पार्टी, अटकेआधी मटणावर ताव, CCTV ने राजेंद्र हगवणेचं पितळ उघडं पडलं
Rajendra Hagawane Saam Tv
Published On

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामधील वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला आधीच अटक करण्यात आली होती. तिचा सासरा आणि दीर फरार होता. या दोघांना सातव्या दिवशी अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांनी मिळवून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला होता यालाच कंटाळून तिने आत्महत्या केली होती. दोन्ही आरोपींनी अटकेआधी मटणावर ताव मारला. पोलिसांनी आज या दोन्ही आरोपींना कसं अटक केली याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. ते सतत आपले ठिकाण बदलत होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात पोलिसांना अडथळे येत होते. अखेर आज या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. महत्वाचे म्हणजे आरोपींनी अटकेपूर्वी एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत मटण पार्टी केली याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत.

Vaishnavi Hagawane: पहाटे मित्रांसोबत पार्टी, अटकेआधी मटणावर ताव, CCTV ने राजेंद्र हगवणेचं पितळ उघडं पडलं
Vaishnavi Hagawane Chats: 'पिंकी ताईंनी खूप मारलं अन्..', वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला सगळंच सांगितलं; पण ही पिंकी आहे तरी कोण?

वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर १७ मे रोजी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिचा नवरा, सासू आणि नणंद या तिघांना लगेच अटक केली. पण सासरा आणि दीर फरार झाले होते. यादरम्यान, राजेंद्र हगवणेंनी आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारला. याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. त्यानंतर गुरूवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमध्ये ते आले होते. त्याचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले. जेवणानंतर ते तिथून निघून गेले. पोलिसांना ही माहिती मिळतचा त्यांनी नाकाबंदी सुरू केली आणि संपूर्ण परिसराची झडती घेतली. अखेर पहाटे साडेपाच वाजता त्यांना पोलिसांनी अटक केली.

Vaishnavi Hagawane: पहाटे मित्रांसोबत पार्टी, अटकेआधी मटणावर ताव, CCTV ने राजेंद्र हगवणेचं पितळ उघडं पडलं
Vaishnavi Hagawane: स्पाय कॅमेऱ्यानं बायकोचे बेडरूममधील VIDEO शूट करायचा अन्..; हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून बायकोचा छळ

दरम्यान, बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशिल हगवणे यांना अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज दुपारी दोन वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांना किती दिवसाचं रिमांड बावधन पोलिसांकडून मागितले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरेल. राजेंद्र आणि सुशिलला कुणी कुणी मदत केली? ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते? त्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे पोलिस जास्त दिवसांची रिमांड मागू शकतात.

Vaishnavi Hagawane: पहाटे मित्रांसोबत पार्टी, अटकेआधी मटणावर ताव, CCTV ने राजेंद्र हगवणेचं पितळ उघडं पडलं
Vaishnavi Hagawane: हुंडाबळी घेणाऱ्या राजेंद्र हगवणेला बेड्या, वैष्णवीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com