
हा व्हिडीओ नीट पाहा. हा आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा जल्लाद सासरा राजेंद्र हगवणे. एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हादरुन गेलाय. तर दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला राजेंद्र हगवणे जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात मटणावर ताव मारतोय..
हा व्हिडीओ पुन्हा पाहा, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं निर्लज्जपणा शब्दाचा अपमान होईल एवढ्या बेफिकीरपणे मटणावर ताव मारलाय. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना कुठला पश्चाताप, ना कुठली भीती. खरंतर पैशांच्या हव्यासापायी राजेंद्र हगवणे, त्याची बायको लता, मुलगी करिश्मा, मुलगा शशांक आणि सुशीलच्या छळामुळे 17 मे ला वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर राजेंद्र आणि सुशीलने पोलिसांना चकमा देत धूम ठोकली.
पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत हगवणे बापलेकाच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्यानंतरही हगवणेचा माज काही कमी झाला नाही. राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा पाहा..अटकेनंतर राजेंद्र हगवणेला पोलीस घेऊन जात असताना वैष्णवीच्या छळाबद्दल पश्चाताप होतोय का? या पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नाही, असं उत्तर दिलंय. हगवणेच्या उद्दामपणावरुन वैष्णवीच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय.
राजेंद्र हगवणेचं एवढं निर्लज्ज वर्तन असेल तर तो किती कोडगा आणि निगरगट्ट आहे हेच दिसून येतंय.आपल्या घरात य़ेणाऱ्या सुना म्हणजे पैसे लुबाडण्याचं साधन समजणाऱ्या या हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा तर दिली पाहिजेच पण त्याचबरोबर वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्यंाही मुसक्या आवळण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.