Vaishnavi Hagawane: 'दीरानं अवघड जागेवर लाथ मारली अन् मोबाईल घेऊन..' वैष्णवीच्या जावेच्या आईकडून हगवणेंचा विकृत चेहरा समोर

Hagavane Family Dark Secrets Exposed: मयुरीच्या आईने एक सविस्तर पत्र महिला आयोगाकडे पाठवत या प्रकरणात कडक कारवाईची मागणी केली आहे.
Hagawane
HagawaneSaam
Published On

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिला देखील हगवणे कुटुंबाकडून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मयुरीने प्रसारमाध्यमांना यासंदर्भातील माहिती दिलीच, पण यासह मयुरीच्या आईने देखील पत्र लिहून राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली. हे पत्र समाजमाध्यमांवर शेअर करत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी महिला आयोगासमोर प्रश्न उपस्थित केला आहे.

वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा समोर आला आहे. वैष्णवीसह तिच्या जावेचा देखील हगवणे कुटुंबाकडून छळ केला जात होता. मयुरीने प्रसारमाध्यमांसमोर सासू, सासरे, नणंद आणि दीराकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. तसेच आज मयुरीच्या आईने हगवणे कुटुंबाचा पत्राद्वारे विकृत चेहरा समोर आणला आहे. सासू, सासरे आणि नणंद मिळून कशा पद्धतीने सुनांचा छळ करतात, हे त्यात त्यांनी नमूद केलं आहे.

Hagawane
Crime: बॅड टच, किस अन् रूममध्ये जबरदस्ती..ट्रेनिंगमध्ये कोचचा कारनामा; मोबाईलमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील VIDEO..

पत्रात केलेलं आरोप?

मयुरीच्या आईने पत्रात सासू, सासरे, नणंद आणि दीर मयुरीचा वारंवार छळ करत असल्याचं उल्लेख केला आहे. 'माझ्या मुलीचा (मयुरी) सासरच्या मंडळींकडून कायम छळ केला जात होता. सासू, सासरे, दीर आणि नणंदेनं तिला कायम मारहाण केली आहे. तिचे कपडे फाडले आहे. तसेच मयुरीच्या दीराने तिच्या अवघड जागेवर लाथ मारली आहे. तुला मुलगा होत नाही तर, आमच्याकडे ये, असं म्हणत शिवीगाळ केली असल्याचा आरोप मयुरीच्या आईने पत्राद्वारे केला आहे.

Hagawane
Vaishnavi Hagawane Chats: 'पिंकी ताईंनी खूप मारलं अन्..', वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला सगळंच सांगितलं; पण ही पिंकी आहे तरी कोण?

मयुरीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. मात्र, याची माहिती मयुरीच्या दीराला म्हणजेच शंशाक हगवणेला कळताच त्याने मोबाईल घेऊन पळ काढला. माझी मुलगी देखील त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे, असं मयुरीच्या आईने आपल्या पत्रात नमुद केलं आहे. पत्रात शेवटी मयुरीला न्याय मिळावा आणि हगवणेंविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Hagawane
Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, छापा टाकताच ग्राहकांसोबत महिला आक्षेपार्ह स्थितीत; ६ महिलांची सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com