Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, छापा टाकताच ग्राहकांसोबत महिला आक्षेपार्ह स्थितीत; ६ महिलांची सुटका

Navi Mumbai Spa Centre: नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अलमो स्पा सेंटरमध्ये स्पा सेवांच्या नावाखाली जबरदस्तीने देहव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Navi Mumbai
Navi MumbaiSaam tv
Published On

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलमो स्पा सेंटरमध्ये स्पा सेवांच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत धडक कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईत स्पा मालक आणि २ मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी प्लान आखत सापळा रचला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने डमी ग्राहक त्या ठिकाणी पाठवला. त्यांनी डमी ग्राहकाद्वारे पुरावे गोळा केले.

Navi Mumbai
Extra Marital: नवरा परस्त्रीसोबत हॉटेलच्या बेडवर, पत्नीने रंगेहाथ पकडलं; पतीने लोखंडी रॉडनं पत्नीचं नाकच फोडलं अन्..

पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे तिथे धडक कारवाई केली. तसेच ६ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईसाठी गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने डमी ग्राहकाद्वारे पुरावे गोळा केले. त्यानंतर केलेल्या धाडीत अनैतिक व्यवसाय उघडकीस आला. पुढील तपास सुरू असून, स्पा सेंटरच्या इतर संबंधितांची चौकशी सुरू आहे.

Navi Mumbai
Crime: मालकीण बाथरूममध्ये आंघोळीला गेली, मोलकरीण बेडरूममध्ये शिरली, कपाटाचे दार उघडताच...

भंडाऱ्यातही देहव्यवसायाचा पर्दाफाश

भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड परिसरात जुन्या रेल्वे लाईनजवळील एका घरात देहव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. घराच्या माळ्यावर चालणाऱ्या या अनैतिक व्यापारात ग्राहकांना महिलांची व्यवस्था केली जात होती. भंडारा पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक छापा टाकत तीन महिला व त्यांच्यासोबत चार ग्राहकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com