Crime: बॅड टच, किस अन् रूममध्ये जबरदस्ती..ट्रेनिंगमध्ये कोचचा कारनामा; मोबाईलमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील VIDEO..

Shooting Coach Arrested for Harassing Female: मोहसीन खान याच्यावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात मोहसीनच्या मोबाईलमध्ये विद्यार्थिनींसोबतचे अश्लील चॅट्ससमोर आले आहे.
crime
crimeSaam Tv
Published On

इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शूटिंग प्रशिक्षक मोहसीन खान याच्यावर विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पॉक्सो कायदा, विनयभंग आणि अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शूटिंग अकादमीत मोहसीन प्रशिक्षण देत होता. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली त्याने विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंदूरमधील अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहसीनचे शूटिंग अकादमी आहे. या अकादमीत तो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती आहे. मात्र, प्रशिक्षण देत तो विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ती २०२१ ते २०२३ दरम्यान अकादमीत प्रशिक्षण घेत होती. या काळात मोहसीनने रायफल हाताळण्याच्या बहाण्याने तिला अयोग्य प्रकारे स्पर्श करत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

crime
Yavatmal Crime: "१० लाख रुपये दिले तरच तिला नांदवू" हुंड्यासाठी छळ अन् भोंदूबाबाकडे नेत अघोरी कृत्य; यवतमाळमध्ये खळबळ

मोबाईलमध्ये आढळले अश्लील चॅट्स आणि व्हिडिओ

पोलिसांनी मोहसीनचा मोबाईल तपासला असता, त्यात १०० हून अधिक मुलींशी चॅटिंग आणि १० हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले. सध्या या सर्व चॅट्स आणि व्हिडीओंचा सायबर फॉरेन्सिक तपास सुरु आहे.

crime
Vaishnavi Hagawane Chats: 'पिंकी ताईंनी खूप मारलं अन्..', वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला सगळंच सांगितलं; पण ही पिंकी आहे तरी कोण?

तक्रारदार विद्यार्थिनीने म्हटले आहे की, "तुझे करिअर संपवेन" अशी धमकी देत तो विद्यार्थिंनीसोबत अश्लील कृत्य करत होता. आरोपीने आतापर्यंत बऱ्याच मुलींना जाळ्यात ओढलं आहे. या प्रकरणात पीडित मुलींनी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

crime
Vaishnavi Hagwane: क्रुर हगवणे फॅमिलीचे फोटो समोर; नणंद, पती अन्.. वैष्णवीला हालहाल करून मारलं

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मोहसीनला अटक केली आहे. तसेच त्याची अधिक चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून अकादमीतील इतर विद्यार्थिनींचेही जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com