Yavatmal Crime: "१० लाख रुपये दिले तरच तिला नांदवू" हुंड्यासाठी छळ अन् भोंदूबाबाकडे नेत अघोरी कृत्य; यवतमाळमध्ये खळबळ

HuNDA Harassment Case: पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असतानाच यवतमाळमधून आणखी एक धक्कादायक हुंडाबळी प्रकरण समोर आले आहे. मारेगाव येथील एका २५ वर्षीय विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Dowry Case
Dowry CaseSaam Tv
Published On

पुण्यातील हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजे असतानाच यवतमाळमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मारेगाव येथील एका २५ वर्षीय विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, हुंड्यासाठी छळ, भोंदूबाबांकडून आघोरी उपचार, तसेच अमानुष वागणुकीचे गंभीर आरोप तिने केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा विवाह २०२० साली गोंदिया जिल्ह्यातील व्यवसायिक आणि ठेकेदार अभिषेक घोषे याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्या लोकांनी तिला पैशासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. आजारी असताना तिला डॉक्टरांकडे न नेत भोंदू बाबाकडे नेण्यात येत होते. घरात उपाशी ठेवून डांबून ठेवणे, असे अनेक प्रकार तिच्यावर लादण्यात आले, असा आरोप तिने केला आहे.

Dowry Case
Crime: संतापजनक! १२ वर्षीय मुलीला शाळेत नेलं अन् मादक पेय पाजलं; गुंगी येताच सामूहिक अत्याचार, परिसरात खळबळ

दरम्यान, पती अभिषेकने तिला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारासाठी भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र, पतीने पैसे नसल्याचे कारण देत जबाबदारी टाळली. रुग्णालयातच तिला चक्कर आल्याने तिला आयसीयूत दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी नातेवाईक पोहोचल्यावर उपचार सुरू झाले आणि त्यानंतर पीडिता आपल्या मालेगाव येथील माहेरी परतली.

Dowry Case
Vaishnavi Hagawane: हगवणे मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अन् बाळाचा ताबा..

महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी जावयाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद देण्याऐवजी वकिलामार्फत नोटीस पाठवली. आई म्हणून मुलासोबत राहण्याच्या इच्छेने तिने यवतमाळ येथील महिला सहाय्य कक्षात अर्ज दिला. त्यानंतरही समेटाच्या उद्देशाने सप्टेंबर २०२३ मध्ये ती सासरी परत गेली, परंतु सासरच्यांनी घरात घेण्यास नकार दिला. उलट, "दहा लाख रुपये दिले तरच तिला नांदवू" अशी अट घातली.

यानंतर पीडितेने थेट पोलिसांत धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पती अभिषेक घोषे, सासरे वामन घोषे आणि सासू संगीता घोषे यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड संहिता (BNS) कलम ८५ व ३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com