Vaishnavi Hagawane: हगवणे मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अन् बाळाचा ताबा..

CM Devendra Fadnavis on Vaishnavi Hagawane Case: सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या महिलेने घरातच आत्महत्या केली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आदेश दिले आहेत.
Vaishnavi Hagwane
Vaishnavi HagwaneSaam
Published On

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या महिलेने घरातच आत्महत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि सासरच्या इतर सदस्यांवर त्रास देण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना फोन करून दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

हगवणे मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण राज्याचे वातावरण तापलं आहे. हुंडा बळीमुळे पुणे हादरलं आहे. आता या प्रकरणामुळे वैष्णवीच्या बाळाचे हाल होत असल्याचं चित्र आहे. वैष्णवीला १० महिन्यांचे बाळ असून, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळावा यासाठी कस्पटे कुटुंबाकडून मागणी होत आहे. सध्या वैष्णवीचं बाळ पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या बंदुकधारी निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती समोर आली आहे.

Vaishnavi Hagwane
Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, छापा टाकताच ग्राहकांसोबत महिला आक्षेपार्ह स्थितीत; ६ महिलांची सुटका

या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज पिंपरी चिंचवड आयुक्तांना फोन केला. त्यांनी हगवणे प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे आदेश दिले आहेत. तसेच १० महिन्यांचे बाळ कुठे आहे, बाळाचा तातडीने शोध घ्या, वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आई वडिलांकडे द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Vaishnavi Hagwane
Operation Sindoor: मदरशांमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' शिकवले जाणार, भाजपशासित राज्यात मोठा निर्णय

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

हगवणे मृत्यूप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मी या प्रकरणावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलेन. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असं पवार म्हणाले. दरम्यान, वैष्णवी हगवणे या माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुन होत्या. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असल्याने या प्रकरणात राजकीय वादंग उभं राहिलं आहे

Vaishnavi Hagwane
Extra Marital: नवरा परस्त्रीसोबत हॉटेलच्या बेडवर, पत्नीने रंगेहाथ पकडलं; पतीने लोखंडी रॉडनं पत्नीचं नाकच फोडलं अन्..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com