Vaishnavi Hagawane Baby: आईविना बाळाचं हाल, वैष्णवीच्या चिमुकल्याची प्रकृती बिघडली, रुग्णालयात नेलं | VIDEO

Vaishnavi Hagawane Baby Health Update: वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टर आता बाळाची तपासणी करत आहे. बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण दिसत आहे.
Vaishnavi Hagawane Baby
Vaishnavi Hagawane BabySaam Tv
Published On

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या सासरच्यांना अटक करण्यात आली आहे.परंतु या सर्व प्रकरणात वैष्णवीच्या बाळाचे खूप हाल झाले आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाल अनेक लोकांकडे होते. गेले ५ दिवस हे बाळ वेगवेगळ्या व्यक्तींकडे होते.त्यानंतर काल हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आता बाळाची प्रकृती बिघडली आहे. बाळाला रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

Vaishnavi Hagawane Baby
Vaishnavi Hagawane: निर्लज्जपणाचा कळस! वैष्णवीच्या मृत्यूनंतर इकडे महाराष्ट्रात हळहळ, तिकडे राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव| VIDEO

बाळाच्या अंगावर इंजेक्शनचे व्रण (Vaishnavi Hagwane Baby Boy)

वैष्णवीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या अंगावणार इंजेक्शन दिल्याचे व्रण आहेत. बाळाले हे इंजेक्शन कोणी दिले, हे इंजेक्शन कसले होते. यामुळेच बाळाची प्रकृती बिघडली नाही ना असे अनेक प्रश्न नातेवाईकांच्या मनात निर्माण झाले आहेत. यानंतर आता डॉक्टर वैष्णवीच्या बाळाची तपासणी करत आहे. त्यानंतर बाळाला नक्की काय झालं आहे हे समजेल.

Vaishnavi Hagawane Baby
Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, सासरे अन् दिराला अटक

वैष्णवीच्या बाळाचे ५ दिवस हाल

वैष्णवीच्या मृत्यूनंतर गेले ५ दिवस बाळाचे खूप हाल झाले होते. हे बाळ फक्त ९ महिन्याचे होते. वैष्णवीचे बाळ आमच्याकडे सोपवलं आहे, असं एका अज्ञात व्यक्तीने सांगितले होते. दरम्यान, वैष्णवीच्या नवऱ्याच्या मावस भावाकडे म्हणजेच अमित पवळेकडे हे बाळ असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर बाळ त्याच्या आत्याकडे नेण्यात आले.

यानंतर शंशाकचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आले. यानंतर बाळाला घेण्यासाठी त्याचे आजी-आजोबा गेले होते. मात्र, बाळ देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर काल वैष्णवीच्या मृत्यूच्या ६ दिवसानंतर तिचे बाळ सुखरुप तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले.

Vaishnavi Hagawane Baby
Vaishnavi Hagawane Case : राजकारण्यांच्या घरात चाललंय काय? आतापर्यंत कोणत्या नेत्यांच्या कुटुंबामध्ये छळाचे प्रकार घडलेत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com