Virar-Marine Drive: आनंदाची बातमी! आता विरारवरुन थेट मरीन ड्राईव्ह, फक्त ४५ मिनिटांत, वाचा नेमका प्लान काय?

Virar-Marine Drive Bridge: विरारवरुन आता तुम्हाला थेट मरीन ड्राइव्ह गाठता येणार आहे. यासाठी सागरी पूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून लवकरच काम सुरु होईल.
Virar-Marine Drive
Virar-Marine DriveSaam Tv
Published On
Summary

विरारकरांसाठी आनंदाची बातमी

आता विरारवरुन थेट मरीन ड्राइव्हला जाता येणार आहे

सागरी ब्रिज सुरु होणार

विरारकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला आहे. उत्तन वसई विरार सी लिंक या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.फक्त पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली नव्हती. मात्र, आता या विभागानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होईल. या प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणूमधीन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रोजेक्टमुळे विरारवरुन थेट मरीन ड्राइव्ह गाठता येणार आहे.

Virar-Marine Drive
Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे प्रवास फक्त दीड तासात! तिसरा महामार्गाला होणार सुरूवात, ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सुटणार

विरार ते साउथ मुंबईचा प्रवास एकदम सुसाट होणार आहे. मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त होणार आहे. सध्या विरार ते वर्सोवा या अंतरासाठी दोन तास लागतात. परंतु हा सागरी पूल हे अंतर दीड तासाने कमी करणार आहे. तुम्ही फक्त ४५ मिनिटांत विरार ते मरीन ड्राईव्हपर्यंत पोहचू शकतात. यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि ट्रेनवरील ताण कमी होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पूर्ण होणार आहे.

या प्रकल्पाला ८७ हजार कोटी रुपये खर्च होता. मात्र, आता हा खर्च ५२,६५२ कोटीपर्यंत आणण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरीही याचा खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.

Virar-Marine Drive
Pune: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पुणे मेट्रो ५०८ मीटर लांबीचा फुट ओव्हर ब्रिज उभारणार

प्रकल्पाची माहिती

विरार ते मरीन ड्राईव्ह हा सागरी पूल ५५.१२ किमी लांबीचा असणार आहे. मुख्य सागरी पूल हा २४.३५ किमी लांब असणार आहे. हा पुल वर्सोवा भाईंदर दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. तर पुढे दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेशी जोणार आहे.

Virar-Marine Drive
Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com