Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे प्रवास फक्त दीड तासात! तिसरा महामार्गाला होणार सुरूवात, ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सुटणार

Third Mumbai Pune Highway : एनएचएआयने नव्या मुंबई-पुणे महामार्ग प्रकल्पाची माहिती दिली आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त दीड तासात करता येणार आहे.
Mumbai Pune Highway
Mumbai Pune Highwayx
Published On
Summary
  • तिसऱ्या मुंबई-पुणे महामार्गाच्या कामाला सुरुवात.

  • नवीन महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास दीड तासात.

  • वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, प्रवाशांचा वेळ वाचणार.

Mumbai Pune New Highway : मुंबईवरुन पुण्याला जाण्यासाठी आता नवीन महामार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तिसऱ्या महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल असे म्हटले जात आहे. एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे पुणे- बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम सुरु आहे. हा महामार्ग मुंबईपर्यंत विस्तारित केला जाणार आहे.

मुंबई-पुणे-बंगळुरू या ८३० किमी लांब द्रुतगती प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाचे काम सुरु असताना प्राधिकरणाने मुंबई–पुणे महामार्गातील पागोटे चौक ते २९.१२९ किमीपर्यंतच्या भागाचा आराखडा तयार झाला आहे. चौक-पुणे, शिवारे या सुमारे १०० किमी लांब टप्प्याचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरु आबे. दुसऱ्या बाजूला पागोटे-चौक टप्प्याच्या कामासाठी दिवाळीनंतर निविदा काढली जाणार आहे. डिसेंबर २०२५ अखेरीस निविदा अंतिम करुन नव्या वर्षात महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात होईल.

Mumbai Pune Highway
IND VS PAK सामन्यात पुन्हा ड्रामा! भारताच्या कर्णधाराने पाकची इज्जत काढली, Handshake केला का? पाहा

पागोटे-चौक आणि चौक-पुण, शिवारे हा महामार्गाचा भाग तयार झाल्यावर मुंबई-पुणे प्रवासासाठी तिसरा द्रुतगती महामार्ग तयार होईल. या तिसऱ्या आणि नव्या महामार्गामुळे सध्याच्या मुंबई-पुणे महामार्गावरील ताण कमी होईल. याशिवाय वाहतूक कोंडीचा त्रासही कमी होईल. या तिसऱ्या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त दीड तासांमध्ये पूर्ण करता येईल.

Mumbai Pune Highway
Pune Crime : दुचाकीला धक्का लागल्यावरुन वाद! तरुणांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या नव्या महामार्गाच्या प्रकल्पासाठी सुमारे ३६५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या तीन तालुक्यांमधील १७५.९४ हेक्टर जागा संपादित करण्याचे काम सुरु आहे. यापैकी ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील काही महिन्यात भूसंपादन संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai Pune Highway
Accident : हिट अँड रनचा थरार! आधी तरुणाला उडवले, मग महिलेचा चिरडले; घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com