7 स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन अन् धक्काबुक्की; महापालिकेत गोंधळ

Ulhasnagar Municipal Corporation 7 Nominated Corporator Election: उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी १५ हून अधिक अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन आणि धक्काबुक्की झाल्याने महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Ulhasnagar Municipal Corporation 7 nominated corporator election
Ulhasnagar Municipal Corporation 7 nominated corporator electionsaam tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. या सात जागांसाठी १५ हून अधिक अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी विशेष महासभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

Ulhasnagar Municipal Corporation 7 nominated corporator election
25 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आज होणार फैसला

दरम्यान, आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून चार, शिवसेनेकडून सहा, तर इतर पक्षांकडूनही अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Ulhasnagar Municipal Corporation 7 nominated corporator election
राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

सात जागांसाठी १५ हून अधिक अर्ज आल्याने आता २४ सप्टेंबरच्या विशेष महासभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सात जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, हे २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com