
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भविष्यातील मुख्यमंत्री आहेत, असे विधान पक्षाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी केले. जामिनावरील सुटकेनंतर आज, शनिवारी दळवी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना पोलिसांनी अटक केली होती. मुलुंड न्यायालयानं दळवी यांना काल, शुक्रवारी काही अटींवर जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर दळवींची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर आज, शनिवारी दळवी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
ठाकरेंच्या भेटीनंतर दळवींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एवढा मोठा प्रसंग घडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार मी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत संघटनात्मक मुद्द्यांवर ठाकरेंशी चर्चा झाली, असे ते म्हणाले.
मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे हे भविष्यातील मुख्यमंत्री आहेत. ते येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेणार आहेत. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आहेत, असेही दळवी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर दळवींना अटक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचे सांगितले जात होते. त्याबद्दल विचारले असता, मला अटक झाल्यानंतर ठाकरेंनी मला दोन ते तीन वेळा फोन केले होते. माझा जामीन लवकर करा, असे त्यांनी आमदारांना सांगितले होते, असे दळवी म्हणाले.
आम्ही पक्षाचं काम करतो. पक्षाची भूमिका मांडण्याचे काम आहे. काही प्रसंग आल्यानंतर पक्षप्रमुख हे पर्वतासारखे उभे राहणारच. माझा जामीन करा असं त्यांनी राऊत यांना सांगितले होते. कार्यकर्त्यांबद्दल उद्धव ठाकरेंना कळकळ आहे. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करतात. मी भेटायला आल्यानंतर त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली, असंही दळवींनी यावेळी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.