Aditya Thackeray On BMC Commissioner: ''मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना रस्त्यांची कंत्राटे दिली ...''; आदित्य ठाकरे यांचे BMC च्या आयुक्तांवर गंभीर आरोप

Aditya Thackeray On BMC Commissioner: मुंबई महानगरपालिकेतील रस्ते मेगा घोटाळ्यातील ५ कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून मोठ्याप्रमाणात दंड वसुली करावी, अशी मागणी युवासेनाप्रमख शिवसेना नेते (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महागरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.
Aditya Thackeray On BMC Commissioner
Aditya Thackeray On BMC CommissionerSaam Digital
Published On

Aditya Thackeray On BMC Commissioner

मुंबई महानगरपालिकेतील रस्ते मेगा घोटाळ्यातील ५ कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून मोठ्याप्रमाणात दंड वसुली करावी, अशी मागणी युवासेनाप्रमख शिवसेना नेते (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महागरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी, आयुक्तांच्या थेट निरीक्षणाखाली मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या रस्ते मेगा घोटाळ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता सातत्याने मांडली आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना 'भेट' दिलीत इथपासून ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळं होताना प्रत्यक्षात मात्र मुंबईत काहीही कामे झाल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रशासक म्हणून तुमच्या देखरेखीखाली मागच्या एका वर्षाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची दयनीय अवस्था होत चाललेली बघून मुंबईकर हैराण झाले आहेत. स्ट्रीट फर्निचर घोटाळा, रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि असे अजून बरेच घोटाळे जे आम्ही उघड करणार आहोत. यातून प्रकर्षाने दिसून येते ती मुंबई महानगरपालिकेची ढासळत चाललेली कार्यक्षमता आणि वाढत चाललेला प्रचंड भ्रष्टाचार, अशी टीका त्यांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मुंबई महागरपालिकेच्या प्रशासक इक्बालसिंग चहल यांना आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न केले आहेत. दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे का? केले असल्यास, ती माहिती सार्वजनिक केली पाहिजे आणि इतर सर्व राज्ये आणि शहरांनाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे.

कंत्राटदाराला त्याच्या गुन्ह्यासाठी दंड भरावा लागला आहे का? कामातला हा हलगर्जीपणा, चूकीच्या प्रशासकीय पद्धती, भ्रष्टाचार आणि घोटाळा, ज्यामुळे कंत्राटदाराचे निलंबन करावे लागले, त्याबद्दल जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि खुद्द महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का? दक्षिण मुंबईतील रस्त्याच्या कामांची सुरुवात व्हावी यासाठी नव्या कंत्राटदाराची निवड कधी केली जाईल? रस्ते मेगा घोटाळ्यातून दिल्या गेलेल्या कामांमधील सद्यस्थितीत किती कामे सुरू झाली आहेत? त्यांची आजची स्थिती काय आहे? रस्त्यांच्या कामाची सद्यस्थिती आम्हाला तपासता यावी यासाठी मुंबईकरांना आश्वासन दिलेले सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड मुंबई महानगरपालिकेने बसवले आहेत का?

Aditya Thackeray On BMC Commissioner
Sharad Pawar News: 'गेलेल्यांची चिंता करु नका, संघटना स्वच्छ झाली...' अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार स्पष्टचं बोलले

आम्ही विचारलेले प्रश्न मूलभूत आणि साधे प्रश्न आहेत. मी आशा करतो की, या प्रश्नांची खोटी आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी उत्तरे प्रतिसाद म्हणून आम्हाला पाठवली जाणार नाहीत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसताना मुंबई महानगरपालिकेत सध्या गोंधळाचे, अपारदर्शक पद्धतींचे, भ्रष्टाचाराचे आणि जुलमी राजवटीचे थैमान सुरू आहे. आजवर जसा प्रतिसाद मिळाला, तसे होणार नाही. या वेळेला कृती होईल. रस्ते मेगा घोटाळ्यातील ५ ही कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Aditya Thackeray On BMC Commissioner
Amol Kolhe News: प्रत्येक चौकात २५ हजारांची वसुली अन् २० गाड्यांवर कारवाई... अमोल कोल्हेंचे खळबळजनक आरोप; काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com