ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादाजी भुसे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दादाजी भुसे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. यातच भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील लिलावात निघालेला गिरणा सहकारी साखर कारखान्यावरून घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
यानंतर भुसे यांनी त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला होता. ज्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, आज, शनिवारी माध्यमांशी बोलताना भुसे यांनी हा दावा केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दादाजी भुसे म्हणाले आहेत की, संजय राऊत हे स्वतःला शिवसेनाप्रमुख समजतात. त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. भुसे यांनी आरोप केला आहे की, राऊत हे शिवसेनेचं मीठ खाऊन शरद पवार गटासाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री व्हायचंही त्यांचं (Dadaji Bhuse said that Sanjay Raut wants to become the Chief Minister) स्वप्न असल्याचं, भुसे म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
ते म्हणाले की, ''आम्ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे शिवसैनिक नोटीसला घाबरत नाही. त्यांनी इतर ठिकाणी नौटंक दाखवावी. आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. मालेगावात हे चालणार नाही, त्यांना मालेगावची माफी मागावी लागेल.''
'राऊतांच्या आरोपाचे सभागृहात उत्तर दिले'
राऊत यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपावर दादा भुसे म्हणाले की, ''राऊतांच्या आरोपाचे सभागृहात उत्तर दिले आहे. राज्याच्या जनतेलाही माहिती दिली आहे. मी न्यायालयात दाद महितली आहे. घटनेने व कायदाने एक नागरिक म्हणून दाद मागितली.
ते म्हणाले, राऊतांना जमीन घेण्यासाठी यावे लागेल, ते काही स्वातंत्र्यसैनिक नाही. त्यांचा आरोप खोटा आहे. त्यांना मालेगावची माफी मागावी लागेल. भुसे हे तुरुंगात जाणार, असंही राऊत म्हणाले होते. यावर भुसे म्हणाले की, ''राऊतांचे मुंगेरी लाल के हसीन स्वप्ने, चुकीचे काम केले असेल तर मलाही तुरुंगात जावे लागेल.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.