Maharashtra Politics: उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; आखला सर्वात मोठा प्लान

Uddhav Thackeray Shivsena News: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी प्लान देखील आखला आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV
Published On

Uddhav Thackeray vs Eknath Shinde News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी प्लान देखील आखला आहे. पक्षाला आणखी खिंडार पडू नये तसेच विधानपरिषदेतील आणखी आमदार फुटू नये, यासाठी ठाकरे गटाकडून पक्षांतर केलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह सुद्धा शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Pune Crime: मामाच्या मुलीसोबत लग्न, १० वर्षांचा सुखी संसार; शांत स्वभावाच्या डॉक्टरने अख्खं कुटुंब का संपवलं?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सर्वात मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह सुद्धा शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली.

सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार, आता नगरसेवक आणि विधानपरिषदेचे आमदार सुद्धा शिंदे गटात सामील होत आहे. नुकत्याच ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या तसेच विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला.

त्यांच्या पाठोपाठ आमदार विप्लव बजौरिया यांनी सुद्धा ठाकरे गटाची साथ सोडली. त्यामुळे विधानसभेप्रमाणे विधानपरिषदेतही पक्षाला खिंडार पडून नये म्हणून उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आणखी 2 नावांची चर्चा, दोघे ओबीसी समाजातील नेते

शिंदे गटात दाखल झालेले आमदार विप्लव बजौरिया आणि आमदार मनीषा कायंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन आमदारांना तातडीने अपात्र करण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे.

याबाबत ठाकरे गटाकडून कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसांत ही याचिका ठाकरे गट सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानपरिषदेत पक्षाला आणखी खिंडार पडू नये यासाठी ठाकरे गटाकडून ही रणनीती आखण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे बहुमत असून उपाध्यक्षपद शिवसेना ठाकरे गटातील नेत्या डॉ. गोऱ्हे यांच्याकडे आहे. येत्या १७ जुलै पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे. १७ जुलै तत्पुर्वी कायंदे यांना अपात्र ठरविण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे संभाव्य फुटीलाही आवर घालता येईल, असे ठाकरे गटातील नेत्यांना वाटत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com