Breaking News

Shiv Sena Operation Tiger : ठाकरेसेनेचे ५ खासदार शिंदेंच्या गळाला? सेनेचं पुन्हा 'ऑपरेशन टायगर'; शिंदेंच्या खासदारानं सांगितला मुहूर्त

Shiv Sena Operation Tiger : ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं दिली जातेय. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे?
Shiv Sena Operation Tiger
Shiv Sena Operation Tiger Saam Tv News
Published On: 

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : ठाकरे सेनेतील आऊट गोईंग काही केल्या थांबत नाहीय, अशातच येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. त्य़ामुळेच ऑपरेशन टायगर पूर्ण केले जाणार आहे. ज्यामुळे ठाकरे सेनेचे ५ खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्राच्या हवाल्यानं देण्यात आलीय. तर दुसरीकडे शिंदे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे सेनेच्या फुटीचा मुहूर्ताचं सांगून टाकलाय.

काय आहे 'ऑपरेशन टायगर'?

ठाकरे सेनेतील नेत्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी 'ऑपरेशन टायगर' राबवले

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून 'ऑपरेशन टायगर'ला सुरुवात

ठाकरेंचे माजी आमदार आणि नेत्यांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश

महापालिका निवडणुका तोंडावर ठाकरेंचे अनेक नेते शिंदेंच्या संपर्कात

नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते शिंदे सेनेत प्रवेशाच्या तयारीत

पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून बचावासाठी शिंदेंना एका खासदाराची गरज

पावसाळी अधिवेशनाआधी 'ऑपरेशन टायगर' पूर्ण करण्याचा निर्धार

Shiv Sena Operation Tiger
Raj-Uddhav Thackeray Alliance : युतीच्या कॉलसाठी 'पहेले तुम, पहेले तुम'; ज्युनिअर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल?

दरम्यान, भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदेंची शिवसेना फोडण्याची तयारी करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर शिंदेसेनेतील किती खासदार भाजपाकडे, किती अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतील, याची आकडेवारीच राऊतांनी मांडलीय.

येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आतापासूनच तयारी सुरु केलीय. अशात तब्बल पाच खासदार जर शिंदेंच्या संपर्कात असतील तर आता ठाकरे नेमकं काय करणार? शिंदेच्या सेनेत जाण्यापासून ठाकरे खासदारांना थांबवणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे शिंदे सेना महायुतीतील जागावाटपाच्या वादावर तोडगा काढून पालिका निवडणुकीला समोरे जाणार का? हे पाहणं ही महत्त्वाचं आहे.

Shiv Sena Operation Tiger
Fixer PA : मंत्र्यांच्या पीएंवर कुणाची नजर? मंत्रालयातील 'दलाल' हद्दपार होणार? सरकारच्या निर्णयानं दलाल बेहाल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com