

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चामधून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवर टीका केली. मोर्चानंतर मात्र सरकारकडून आयोजकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत आझाद मैदान सोडून इतरत्र कुठल्याही मोर्च्याला बंदी असतानाही ठाकरे बंधूंनी काढलेला 'गर्जना मोर्चा' पोलिसांच्या अडचणीत सापडला आहे.
कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गर्दी जमवून मोर्चा काढल्याप्रकरणी आता या मोर्चाच्या मुख्य आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणे या कलमांखाली ही कारवाई केली जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
ठाकरेंचा गर्जना मोर्चा हा खरोखरच गर्जना असलेला ठरलाय. उद्धव आणि राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार प्रहार केला. या मोर्चेसाठी अनेक पक्षांनी सहभाग नोंदवला. ठाकरे बंधूंच्या या गर्जनेमुळे केंद्र सरकारला धडकी भरलीय. त्यामुळेच कारवाई सत्र होत असल्याची चर्चा आहे. मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही मोर्चाला परवानगी नाहीये यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.