भाजपच्या बैठकीत अचानक तुकाराम मुंढेंच्या एफडीएची रेड, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

BJP meeting Pune : पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाची अचानक एन्ट्री झाली. अधिकाऱ्यांनी नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेतले.
BJP meeting Pune
BJP meeting Pune
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

FDA surprise inspection at BJP state executive meeting Pune : पुण्यात आयोजित भाजपच्या महत्त्वाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज राजकीय चर्चांपेक्षा एका वेगळ्याच घटनेची सर्वाधिक चर्चा रंगली. राज्यात सध्या भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच, आज या बैठकीच्या ठिकाणी एफडीएच्या पथकाने थेट 'सरप्राइज एन्ट्री' मारली.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी थेट भाजप नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्याच मोठ्या बैठकीत ही घटना घडल्याने सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

BJP meeting Pune
Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी येऊन अन्नाची तपासणी केली आणि नमुने घेतले. मात्र, प्राथमिक तपासणीदरम्यान त्यांना कोणताही आक्षेपार्ह प्रकार आढळलेला नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

BJP meeting Pune
चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय; कंत्राटदारांनाही दिला इशारा

दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. मात्र, या राजकीय बैठकीच्या ठिकाणी एफडीए पथकाने केलेली अन्नपदार्थांची तपासणी सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

BJP meeting Pune
Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. मात्र, या सर्व राजकीय चर्चांबरोबरच भाजपच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने केलेली अन्नपदार्थांची तपासणी आणि घेतलेले सॅम्पल सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com