चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय; कंत्राटदारांनाही दिला इशारा

Uday Samant Press : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे निर्णय घेतले. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेत कंत्राटदारांना इशारा देण्यात आला.
CHAKAN MIDC ROAD CRISIS: UDAY SAMANT SETS AUGUST 31 DEADLINE, WARNS CONTRACTORS
CHAKAN MIDC ROAD CRISIS: UDAY SAMANT SETS AUGUST 31 DEADLINE, WARNS CONTRACTORSsaam tv
Published On
Summary
  • चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर सरकारकडून मोठा निर्णय.

  • येत्या 31 ऑगस्टपर्यंत चाकण MIDC मधील सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे लक्ष्य.

  • रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांमुळे जवळपास २० लघुउद्योगांवर परिणाम

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या मुद्दा चांगलाच तापलाय.विरोधक उद्योजकांकडून सरकारवर टीका केली जातेय. येथील वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात घडत असल्याने जवळपास २० लघुउद्योगांनी त्यांच्या कंपन्यांनी उद्योग बंद करण्याच निर्णय घेतलाय.

CHAKAN MIDC ROAD CRISIS: UDAY SAMANT SETS AUGUST 31 DEADLINE, WARNS CONTRACTORS
साहेब, आमच्यावर दादागिरी होतेय, मी...; उद्योगमंत्री उदय सामंतसमोर शेतकऱ्याचा संताप | Video Viral

राज्यातून कंपन्या स्थंलातर करत आहेत. त्याच मुद्यावरुन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण दौरा केला. यावेळी त्यांनी उद्योजकांसह आणि शेतकऱ्यांची प्रश्न ऐकून घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महत्वाचे निर्णय घेतलेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. वाहतूक कोंडीबाबत शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म निर्णय घेतल्याची माहिती उद्योग मंत्र्यांनी दिली. आरएमसी सारखे मटेरियल वापरून शॉर्ट टर्म मध्ये खड्डे बुजवले जातील. अनेक रस्ते मंजूर झालेत, जे कंत्राटदार वेळेत काम करत नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट टाकलं जाईल. घनकचरा प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही त्यासाठी जागा देतोय.

CHAKAN MIDC ROAD CRISIS: UDAY SAMANT SETS AUGUST 31 DEADLINE, WARNS CONTRACTORS
केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

PMRDA त्याबाबत टेंडरही काढेल असे सामंत म्हणालेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नोडल आधिकारी म्हणून काम करतील. ते MIDC PMRDA PWD NHI चार विभागांचे समन्वयक म्हणून काम करतील. रस्ते पाणी लाईट पायाभूत सुविधा देण्यासाठी समन्वय समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी काम करतील अशी माहिती सामंत यांनी दिली.

अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिकबाबत पोलीस कारवाई करतील

तीन-तीन मीटर रस्ते वाढवले जातील. सब स्टेशन वाढवले जातील. 59 कोटींचा रस्ता PWA कडे आहे. तिथं रात्रीत खड्डे भरले गेलेत. ट्रक टर्मिनल केलाय, MIDC ने हॉस्पिटलला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाणी पुरवठाबाबत संबंधित मंत्री स्वतः इथं येऊन बैठक घेतील. त्याबाबत ही तोडगा काढला जाईल. दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी बैठक घेतली.

बैठक घेऊन त्या-त्यावेळी तोडगा काढला जाईल. मी सुद्धा प्रत्येकवेळी येईन किंवा बैठक घेईन असे सामंत म्हणाले. दरम्यान, आजपासून दहा महिन्यात उद्योजकांना अपेक्षित सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. प्रत्येक दोन महिन्याला आपण आढावा बैठक घेणार असल्याचेही सामंत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com