तुकाराम मुंढेंची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करा; कोणी केली सर्वात मोठी मागणी?

Make Tukaram Mundhe Chief Election Commissione: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर CJP आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तुकाराम मुंढे यांना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी करणारे पोस्टर झळकले.
TUKARAM MUNDHE FOR CHIEF ELECTION COMMISSIONER
TUKARAM MUNDHE FOR CHIEF ELECTION COMMISSIONERsaam tv
Published On: 

केंद्रीय निवडणूक आयोगाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीच्या विरोधात सीजेपीने आंदोलनाची हाक दिली. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन सुरू झाले असून मोठ्या संख्येने तरुणाई आंदोलनात जमा झाली आहे. संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात जिथे नजर जाईल तिथे तरुण हे हातात तिरंगा घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे. तसेच देशभक्तीचे गाणे लावून लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी आवाज उठवावा असे आवाहन करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक ज्येष्ठ मंडळी देखील सामील झाल्याचे दिसून आले.

TUKARAM MUNDHE FOR CHIEF ELECTION COMMISSIONER
आता प्रधानांच्या प्रधानचा राजीनामा; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

तर या मोर्चामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पोस्टर झळकले. काही सिटीजन लोकांनी हे पोस्टर दाखवत मुंढे यांना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त करा अशी मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांची भेसळमाफियांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू आहे. लोकांच्या ताटात कशाप्रकारे विष आणून ठेवलं जातं याचा पर्दाफाश त्यांनी केला. अशाच कामगिरीची गरज आता निवडणूक आयोगात देखील आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी वर्णी लावावी अशी मागणी सीजेपीच्या आंदोलनात होत आहे.

मोदीजी माफ करा... तरुणाकडून ज्ञानेश कुमारांची मिमिक्री

आंदोलनादरम्यान एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मिमिक्री केली. मोदीजी माफ करा, मी तुमचं काम करू शकत नाही, असं म्हणत तरुणाने ज्ञानेश कुमार यांच्यावर उपरोधिक भाष्य केलं. या मिमिक्रीचा व्हिडीओही आंदोलनस्थळी चर्चेचा विषय ठरला.

आंदोलनामुळे ज्ञानेश कुमारांवर उठाबशा काढण्याची वेळ येईल"

ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना एका तरुण आंदोलकाने आक्रमक प्रतिक्रिया दिली. या आंदोलनामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर उठाबशा काढण्याची वेळ येईल, असं मत त्याने व्यक्त केलं.

65 वर्षीय आंदोलकाची हजेरी; टाळ वाजवत मुंबईकरांना जागं करण्याचा प्रयत्न

या आंदोलनात 65 वर्षीय व्यक्तीनेही सहभाग घेतला. मुंबईकरांना जागं करण्यासाठी आपण टाळ वाजवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणाईसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने शिवाजी पार्कातील आंदोलनाला वेगळं स्वरूप पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com