मुंबई: कार्डिलिया क्रूझ प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत असताना. या प्रकरणातही आता राजकिय नेत्यांनी उड्या घेतलेल्या आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार नितेश राणेंनी यात उडी घेतलेली पहायला मिळते. नितेश राणे यांच्या ट्विटमुळे या प्रकरणाला धार्मिक वळण मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. (Trying to give a religious twist to the NCB’s action?)
हे देखील पहा -
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत नेमकं याच प्रकरणात का बोलत आहेत. सुशांत प्रकरणात का नाही पत्रकार परिषद घेतली असा प्रश्न केला. एवढ्यावरच न थांबता नितेश राणेंनी या प्रकरणात नवाब मलिक 'खान' हे नाव समोर आहे म्हणून या गुन्ह्यांबाबत बोलत आहेत. सुशांत सिंहच्या वेळी का पुढे येऊन बोलले नाही. कारण सुशांत हिंदू असल्याने त्याला व्यसनाधीन ठरवण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातही असाच राजकिय नेत्याचा हस्तक्षेप पहायला मिळाला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या, त्यावेळी तर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिस, सीबीआय, मुंबई गुन्हे शाखा, ईडी आणि एनसीबीने केला. मात्र पाच तपास यंत्रणांनी गुन्ह्याचा तपास करूनही सुशांतच्या आत्महत्येचे राजकारण झाले, मात्र आत्महत्येचे कारण आजही गुलदस्त्यात आहे.
मात्र नितेश राणेंच्या या ट्विटनंतर कार्डिलिया क्रूझ प्रकरणात एनसीबीच्या कारवाईला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असताना राजकीय टीका टिप्पणी करुन त्याला धार्मिक रंग देणं योग्य नसल्याचे मत मुस्लिम विचारवंत अस्लम खोत यांनी मांडलेलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.