

>> संजय गडदे
मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली परिसरातील नाईट पबमध्ये एका ग्राहकाने तलवार काढून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पबमधील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले व ग्राहकांनी पबमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत रात्री 1 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि बार सुरू ठेवण्यास परवानगी असताना आंबोली पश्चिमेकडील अनेक बार पहाटे उशिरापर्यंत सुरू असतात. रविवारी रात्री उशिरा आंबोलीतील इलुजन पबमधील ग्राहक आणि पबचे कर्मचारी यांच्यात वाद झाल्यानंतर तीन ग्राहकांनी तलवारी काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र तलवार आणि पिस्टल पाहून ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले एकच गोंधळ माजला. यानंतर घाबरलेल्या ग्राहकांनी पबमधून पळ काढला.
याप्रकरणी पहाटे आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आंबोली पोलीस अधिकचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.