Pimpri Chinchwad : जमीन खोदण्याच्या टिकावणे पती पत्नीची हत्या; पुण्यातील मन सुन्न करणारी घटना

Pune Crime News : पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.
Bhosri Police Station
Bhosri Police StationSaam Tv
Published On

Pune Latest Crime News : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाने पिंपरी-चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमीन खोदण्याच्या टिकावणे पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड मधील दापोडी परिसरात घडली आहे.

Bhosri Police Station
Bhagat Shingh Koshyari Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल

खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे आणि संगीता काटे अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. तर प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

Bhosri Police Station
Ahmednagar News : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज

घटनेत शंकर नारायन काटे आणि त्याच्या पत्नीचा संगीता काटे जागीच मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसर हादरलं आहे. अद्याप या दुहेरी हत्येचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना शनिवारच्या रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com