Ahmednagar News : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज

गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
Gautami Patil
Gautami PatilSaam TV
Published On

सचिन बनसोडे

Ahmednagar News : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा आणखी एक कार्यक्रम मोठ्या गोंधळात पार पडला. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे बिरोबा यात्रेनिमीत्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या‌ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमीचे नृत्य सुरू होताच अनेक तरूणांनी बँरेकेट हटवण्याचा प्रयत्न केला. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. ( Latest

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक बाऊंसर, एक डझन महिला बाऊंसर तसेच ३० ते ४० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. गर्दीवर नियंत्रण मिळवताना बाउंसरसह पोलिसांची मोठी दमछाक झाली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये या आधी देखील तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे.

Gautami Patil
Gautami Patil Dance : गौतमी पाटीलला मोठा धक्का; पुणे पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली

नुकतंच गौतमीचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मी करते तुम्हाला मुजरा असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये गौतमी कमालीचा डान्स करताना दिसत आहे. संगमनेर येथील आयोजीत कार्यक्रमात तिने अनेक गाण्यांवर डान्स केला मात्र या कार्यक्रमातील हुल्लडबाज तरुणांमुळे पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Gautami Patil
Gautami Patil: "होऊ दे धिंगाणा" गौतमीच्या नवीन लावणीवरही होणार शिट्ट्यांचा पाऊस

पुण्यातील कार्यक्रमाला नाकारली परवानगी

काही दिवसांपूर्वी लावणी डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पुण्यात पोलिसांनी परवानगी नाकारली. पुण्यातील शिवणे येथील राजकीय नेते संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. पण या कार्यक्रमाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आयोजकांचा आणि गौतमीच्या फॅन्सचा हिरमोड झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com