Gautami Patil Pune Dance Program Cancel
Gautami Patil Pune Dance Program CancelSaam TV

Gautami Patil Dance : गौतमी पाटीलला मोठा धक्का; पुणे पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली

लावणी डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पुण्यात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Published on

Gautami Patil Pune Dance Program Cancel : पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लावणी डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पुण्यात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यातील शिवणे येथील राजकीय नेते संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. पण या कार्यक्रमाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आयोजकांचा आणि गौतमीच्या फॅन्सचा हिरमोड झाला आहे. (Latest Marathi News)

Gautami Patil Pune Dance Program Cancel
Baachu Kadu : आमचे २० मंत्रीच ४० मंत्र्यांचं काम करतात; अजित पवारांच्या 'त्या' टीकेला बच्चू कडूंचं उत्तर

मागील काही महिन्यांपासून लावणी डान्सर गौतमी पाटीलने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलं आहे. गौतमीचा डान्स बघण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी असते. गौतमी पाटीलच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तसेच तरुणांमध्ये तिची क्रेझ निर्माण झाली आहे.

‘सबसे कातील, गौतमी पाटील’, असं ब्रीदवाक्य तिच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज म्हणजेच शुक्रवारी पुण्यातील शिवणे येथे सायंकाळी ७ वाजता राजकीय नेते संजय धिवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गौतमी पाटील हजेरी लावणार होती.

संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमानंतर गौतमीच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार होता. पण परवानगी नसल्याने ऐनवेळी गौतमीच्या कार्यक्रमाला उत्तम नगर पोलिसांनी परवानगी नाकारली.

Gautami Patil Pune Dance Program Cancel
Viral News : विवाहित महिलेला प्रपोज करायला गेला अन् फजिती करून बसला; तरुणाला घडली चांगलीच अद्दल, पाहा VIDEO

दरम्यान, गौतमीच्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नसल्याचं ऐनवेळी सांगून पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याची माहिती आहे. त्यामुळे गौतमीच्या लावणीची आस लावून बसलेल्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. जशीही परवानही नाकारल्याची बातमी आली, तसे गौतमीचे चाहते संतापलेले पाहायला मिळाले.

अजित पवारांनी व्यक्त केला होता संताप

काही दिवसांआधीच राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रात अनेक पक्षाचे लोक गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करतात मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले.

लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com