अमर घटारे, साम टीव्ही
Baachu Kadu On Ajit Pawar Statement : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, मात्र शिंदे-फडणवीस सरकारला ७ महिने पूर्ण झाले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)
अजित दादांनी दिलेले उदाहरण फार चांगलं नाही. दुसरे उदाहरणही अजित पवारांना (Ajit Pawar) देता आलं असतं. विस्तार जरी झाला नाही तरी कामकाज काही कमी झाले नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मागच्या सरकारचा (महाविकास आघाडी) विस्तार झाला मात्र कामच झाले नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे. (Maharashtra Political News)
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले आमचे 20 मंत्री 40 मंत्र्यासारखं काम करत आहे. आमचे 20 मंत्रीच सक्षम आहे. कोणाचे काम अडले असेल तर सांगा. आता मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता नाही तर यापुढे कोणी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय काढू नये, अशी बोचरी टीकाही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांवर केली आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
"शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का?" असा सवाल विचारत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
"सरकारला सत्ते येऊन सात महिने झाले, मात्र अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येते यांना मात्र साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही" असा टोलाही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकाला लगावला होता.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.