

१ जानेवारी २०२६ पासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू
मुंबईतून धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस आणि वंदे भारत गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
५ ते ३० मिनिटांपर्यंत वेळेत बदल करण्यात आला
ऑपरेशनल आणि तांत्रिक कारणांसाठी वेळापत्रकात सुधारणा करण्यात आल्याची माहिती
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल होत आहे. अनेक वंदे भारत ट्रेन आणि लांबपल्ल्याच्या गाडयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामधील अनेक ट्रेन मुंबईमधून सुटणाऱ्या आहेत. नवीन रेल्वे वेळापत्रक १ जानेवारी २०२६ पासून लागू केले जाईल.
रेल्वेने सांगितले की, १ जानेवारी २०२६ पासून चक्रधरपूर रेल्वे विभागातून जाणाऱ्या आणि येथून निघणाऱ्या २४ एक्स्प्रेस, वंदे भारत आणि मेमू गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. बदलामुळे, हावडा, शालीमार, टाटानगर आणि राउरकेला येथून सुटणाऱ्या आणि थांबणाऱ्या २४ गाड्यांच्या वेळापत्रकात ५ ते १५ मिनिटे ते अर्धा तासांचा बदल करण्यात आला आहे. रेल्वेने स्पष्ट केले की हे सुधारित वेळापत्रक ऑपरेशनल सोयीसाठी आणि तांत्रिक कारणांसाठी लागू करण्यात आले आहे.
प्रवाशांना नवीन वेळापत्रकाबद्दल सविस्तर माहिती १३९ या रेल्वे चौकशी क्रमांकावर कॉल करून, नॅशनल ट्रेन चौकशी प्रणाली (NTES) अॅप वापरून किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मिळू शकते असे देखील रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. १ जानेवारीनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटांवर छापलेल्या वेळापत्रकाऐवजी अपडेट केलेल्या वेळापत्रकानुसार स्टेशनवर येण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
१) ट्रेन क्रमांक १२१५२ हावडा- लोकमान्य टिळक समरसत्ता एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून संध्याकाळी ७:३५ ऐवजी संध्याकाळी ७:२५ वाजता सुटेल.
२) ट्रेन क्रमांक २२८३० शालीमार -भुज सुपरफास्ट एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरून संध्याकाळी ७:५५ ऐवजी ७:५० वाजता सुटेल.
३) ट्रेन क्रमांक २०९७२ शालीमार -उदयपूर एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरून संध्याकाळी ७:५५ ऐवजी ७:५० वाजता सुटेल.
४) ट्रेन क्रमांक १२१०२ हावडा -लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल.
५) ट्रेन गाडी क्रमांक १२९०६ हावडा- पोरबंदर ओखा एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल.
६) ट्रेन क्रमांक २२९०६ शालीमार - ओखा सुपरफास्ट एक्स्प्रेस ही शालीमार स्टेशनवरून रात्री ८:२० ऐवजी रात्री ८:१५ वाजता सुटेल.
७) ट्रेन क्रमांक १२२६२ हावडा - मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून सकाळी ५:४५ ऐवजी सकाळी ०५:३५ वाजता सुटेल.
८) ट्रेन क्रमांक १२८१३ हावडा- टाटानगर स्टील एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून सायंकाळी ५:२० ऐवजी ५:१० वाजता निघेल.
९) ट्रेन क्रमांक १८०११ हावडा- आद्रा चक्रधरपूर एक्स्प्रेस रात्री ११:३५ ऐवजी रात्री ११:३० वाजता हावडा स्टेशनवरून सुटेल.
१०) ट्रेन क्रमांक १८०५० बदामपहार - शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस सकाळी ६ ऐवजी सकाळी ६:१५ वाजता शालीमार स्थानकावर पोहोचेल.
११) १२१२९ पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस सकाळी ५:१० ऐवजी सकाळी ५:२५ वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.
१२) ट्रेन क्रमांक १८०१२ चक्रधरपूर - आद्रा - हावडा एक्स्प्रेस सकाळी ५:२५ ऐवजी सकाळी ५:३५ वाजता हावडा स्टेशनवर पोहोचेल.
१३) ट्रेन क्रमांक २०८९४ पाटणा - टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेस टाटानगर स्टेशनवर ९:३० ऐवजी ९:४० वाजता पोहोचेल.
१४) ट्रेन क्रमांक १८१८५ टाटानगर - गोड्डा एक्स्प्रेस ही टाटानगर स्टेशनवरून दुपारी २ ऐवजी दुपारी १:५५ वाजता सुटेल.
१५) ट्रेन क्रमांक २०८९१ टाटानगर - ब्रह्मपूर वंदे भारत एक्स्प्रेस टाटानगर स्टेशनवरून दुपारी २:३० ऐवजी २:२० वाजता सुटेल.
१६) ट्रेन क्रमांक २०८९२ ब्रह्मपूर - टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २:४० ऐवजी दुपारी २:५० वाजता टाटानगर स्टेशनवर पोहोचेल.
१७) ट्रेन क्रमांक १८११७ राउरकेला - गुणुपूर राज्यराणी एक्स्प्रेस राउरकेला स्टेशनवरून रात्री ९:२५ ऐवजी रात्री ९:२० वाजता सुटेल.
१८) ट्रेन क्रमांक १८१२५ राउरकेला - पुरी एक्स्प्रेस ही राउरकेला स्टेशनवरून सकाळी ८ ऐवजी सकाळी ७:५० वाजता सुटेल.
१९) ट्रेन क्रमांक १८१०५ राउरकेला - जयनगर एक्स्प्रेस ही राउरकेला स्थानकावरून दुपारी ४:४५ ऐवजी दुपारी ४:३५ वाजता सुटेल.
२०) ट्रेन क्रमांक १८११८ गुणुपूर - राउरकेला राज्य राणी एक्सप्रेस सकाळी ८:१५ ऐवजी सकाळी ८:३० वाजता राउरकेला स्थानकावर पोहोचेल.
२१) ट्रेन क्रमांक ६८०३० झारसुगुडा - राउरकेला मेमू सकाळी ११:२५ ऐवजी ११:३० वाजता राउरकेला स्टेशनवर पोहोचेल.
२२) ट्रेन क्रमांक ६८०२६ राउरकेला- चक्रधरपूर सारंडा मेमू राउरकेला स्थानकावरून संध्याकाळी ४:२० ऐवजी ४ वाजता सुटेल.
२३) ट्रेन क्रमांक ५८०२७ खरगपूर - राउरकेला पॅसेंजर ट्रेन राउरकेला स्थानकावर सायंकाळी ७:१० ऐवजी सायंकाळी ७:४० वाजता पोहोचेल.
२४) ट्रेन क्रमांक १८११६ चक्रधरपूर - गोमोह मेमू एक्स्प्रेस दुपारी १:२० ऐवजी दुपारी १:३० वाजता गोमोह स्थानकावर पोहोचेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.