Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

Raigad Pune Tamhini Ghat Accident news : पुण्यातील सहा मित्रांची थार ताम्हिणी घाटात ५०० फूट दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. ड्रोनद्वारे शोध घेताना गाडी आणि मृतदेह आढळले. वेग आणि नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील सहा मित्र कोकण सफरीसाठी निघाले होते

  • ताम्हिणी घाटात मृत्यूने घेरलं

  • थार गाडी तीव्र वळणावरून ५०० फूट खोल दरीत कोसळली

  • ड्रोनच्या मदतीने गाडी आणि मृतदेह सापडल्याने घटनेचा उलगडा झाला

  • पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी काम करत आहेत

  • अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोकणात फिरण्यासाठी निघालेल्या ६ मित्रांवर काळाने घाला घातला आहे. पुण्यातून कोकणात जाताना हे ६ मित्र ज्या थार गाडीतून निघाले ती गाडी ताम्हिणी घाटात तीव्र वळणावर असलेल्या दरीत ५०० फूट खोल कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम शहाजी चव्‍हाण (वय-२२, रा.कोंढवे धावडे, पुणे ), पुनित सुधारक शेट्टी (वय-२०, रा.कोपरे गाव, उत्‍तमनगर, पुणे ), साहील साधु बोटे (वय-२४, रा.कोपरे गाव, उत्‍तमनगर, पुणे), महादेव कोळी (वय-१८, रा.कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), ओंकार सुनील कोळी (वय-१८, रा.कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), शिवा अरुण माने, (वय-१९, रा.कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे) हे सर्व सहा मित्र सोमवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी निघाले.

Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता
Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

त्‍यानंतर त्‍यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्‍यामुळे पालकांनी उत्‍तमनगर पोलिसांत ते हरवल्‍याची तक्रार दिली. त्‍यानंतर पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेज आणि लोकेशनच्‍या माध्‍यमातून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेतला. आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी ताम्हिणी घाटात (जि.रायगड) अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेतला असता दरीत थार मोटार व चार मृतदेह लांबून दिसून आले. त्‍यानंतर शोधकार्याने वेग घेतला. गाडी व मृतदेह अत्‍यंत खोल दरीत असल्‍यामुळे बचाव कार्य अत्‍यंत आव्‍हानात्‍मक झाले आहे.

Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता
Pune : ससून रुग्णालयातून भाजप नेत्याचे सासरे गायब, २ महिन्यांपासून शोध सुरू; नेमकं काय घडलं?

माणगाव पोलिस, रायगड आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मुळशी तालुका आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समिती संस्‍था, स्‍थानिक ग्रामस्‍थ यांच्‍यावतीने बचावकार्य सुरु आहे. मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. पुण्‍याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावांनतर घाट उतरताना पहिल्‍याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्‍याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता
Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

मुळशी तालुका व पुणे जिल्‍हयाची हदद संपल्‍यानंतर रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. हा अत्‍यंत तीव्र वळणांचा घाट आहे. आजुबाजुला उभी व खोल दरी, घनदाट जंगल असा हा परिसर आहे. वेगात असलेली वाहने वळणावर अनियंत्रीत झाल्‍यास दरीच्‍या बाजुला ओढली जातात. संपुर्ण परिसर अपघात प्रवणक्षेत्र आहे. येथे लोखंडी रेलींग्‍स आहेत. परंतू येथे घाटात जाड भिंतींची उपाययोजना तसेच वेगमर्यादा राखण्‍यासाठी गती नियंत्रक करणे गरजेचे आहे.'असे प्रमोद बलकवडे, शेलार मामा, सामाजिक कार्यकर्ते अंकुश ढमाले यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com