Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असला तरी निफाड, परभणी, धुळे, अहिल्यानगर, पुणे, नाशिकसह अनेक भागांत पारा १० अंशांच्या खालीच आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?
Maharashtra Weather UpdateSaam tv
Published On
Summary
  • निफाड आणि परभणी येथे ७°C ची नोंद; धुळे ७.२°C वर

  • पुणे, नाशिक, जळगावसह अनेक शहरांत पारा १०°खाली

  • तापमानात चढ-उतार होणार, पण थंडी कायम राहण्याचा IMD चा अंदाज

  • हवामान बदलामुळे आजारांचा धोका वाढला

राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असला तरी काही भागांत हुडहुडी कायम आहे. बऱ्याच ठिकाणी पारा अद्याप १० अंशांच्या खाली गेला आहे. आज राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचे संकेत असले तरी, थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे.

काल निफाड आणि परभणी येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे ९ अंश, तर पुणे, जेऊर, मालेगाव, ‎‎नाशिक, जळगाव, भंडारा आणि यवतमाळ येथे १० अंशामपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?
Viral Video: झोपेत लोळत लोळत १० व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला, ८ व्या मजल्यावर ग्रीलमध्ये उलटा लटकला, दैव बलवत्तर म्हणून...

महाराष्ट्रातील निफाड, धुळे, परभणी, अहिल्यानगर येथे काल थंडीचा कडाका कायम होता. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी गारठा कायम होता. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. थंडीच्या कडाक्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. तर तापमानात होणाऱ्या सततच्या बदलावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com