Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा

Titwala Police: टिटवाळ्यातील बल्यानी परिसरात ही घटना घडली. मित्राच्या मदतीने या तरुणाने आपल्या सावत्र बापाचा काटा काढला.
Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा
Titwala PoliceSaam Tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या सावत्र वडिलांची तरुणाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणनजीकच्या टिटवाळा येथे ही घटना घडली आहे. टिटवाळ्यातील बल्यानी परिसरात ही घटना घडली. मित्राच्या मदतीने या तरुणाने आपल्या सावत्र बापाचा काटा काढला. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा
Sangli Crime News : महिलेला मारहाण करून जबरी चोरी, दागिने केले लंपास; पलूस तालुक्यातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील टिटवाळा परिसरातील बल्याणी गावात हार्डवेअरच्या दुकानात काम करणारा कदीर सिद्दीकी याची रविवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती . कदीर हा त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याने काही वर्षांपूर्वी वयाने मोठी असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि मुलगी आहे. या हत्येप्रकरणाच्या तपासादरम्यान टिटवाळा पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.

Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा
Kalyan Crime News : मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी चोरीचा मार्ग; चोरी करणारी महिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी १२ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी हत्या करण्यात आलेल्या कदीर यांचा सावत्र मुलगा कबीर सिद्दीकी आणि त्याचा साथीदार मित्र अल्ताफ शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. कबीरने अल्ताफच्या मदतीने सावत्र वडिलांची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. सावत्र वडील कदीरची आपल्या बहिणीकडे वाईट नजर असल्याचा संशय कबीरला होता. या संशयातूनच कबीरने कदीरची हत्या केली. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात खळबळ उडाली आहे. टिटवाळा पोलिस पुढील तपास करत आहेत.

Titwala News: बहिणीवर वाईट नजर असल्याचा संशय, मुलाने सावत्र बापाचा काढला काटा
Navapur Crime : सुवर्णपेढीवर दरोडा, तीन चोरटे दागिने घेऊन फरार; नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com