Navapur Crime : सुवर्णपेढीवर दरोडा, तीन चोरटे दागिने घेऊन फरार; नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीतील घटना

Nandurbar News : चोरट्याना देखील बाहेर कोणी असल्याचे समजले असता त्यांनी काही मिनिटांतच मिळेल ते दागिने व रोख रक्कम गोणीत भरुन ज्वेलर्सच्या दुकानातून पोबारा केला
Navapur Crime
Navapur CrimeSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गायत्री ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. चोरटे दुकानातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीसांना अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.  

Navapur Crime
Burning Car : घाट रस्ता चढताच कारने घेतला अचानक पेट; जुन्या पुणे मुंबई महामार्गावरीळ घटना, तिघे बचावले

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील विसरवाडी बाजारपेठेत गायत्री ज्वेलर्स हे सोने- चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. दरम्यान मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. याचवेळी निलेश लोहार हे घराकडे जात असताना त्यांना दुकानात काही चाहूल लागली. सुवर्णपेढीत (theft) चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानात शिरलेल्या चोरट्याना देखील बाहेर कोणी असल्याचे समजले असता त्यांनी काही मिनिटांतच मिळेल ते दागिने व रोख रक्कम गोणीत भरुन ज्वेलर्सच्या दुकानातून पोबारा केला. घटनेबाबत (Police) पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून तपस सुरु आहे. 

Navapur Crime
Ahmednagar News : मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ; १४ जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

सायरन वाजल्याने मोथे नुकसान टळले 
यापूर्वी देखील गेल्या वर्षी ऑगस्टच्याच महिन्यात अशाप्रकारे चोरीचा प्रयत्न झाला होता. या वेळी दुसर्‍यांदा ज्वेलर्सचे दुकान फोडले असल्याचे दुकान मालकाने सांगितले. विसरवाडी येथील सोन्याचे व्यापारी यांनी दुकानात सायरन लावल्याने त्यांची मोठी चोरीचा डाव फसला. चोरट्यांनी सटर तोडल्याबरोबर सायरनचा मोठा आवाज आल्याने नागरिक सतर्क झाले. यामुळे चोर पळाले आणि मोठ्या चोरीचा डाव फसला 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com